अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन व आणीबाणी विभागाचे प्रमुख भागवत सोनोने यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष, उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवेसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे. बदलापूर व अंबरनाथमधील अग्निशमन व्यवस्थेच्या उभारणीत, आधुनिक वाहनांची खरेदी, केंद्रांचे आधुनिकीकरण, आपत्ती वेळी धाडसी बचावकार्य आणि कोविड काळातील सामाजिक योगदान या सर्व कार्यांची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. याआधीही विविध पुरस्कारांनी गौरवले गेलेले सोनोने यांचा हा राष्ट्रीय पातळीवरील सन्मान अंबरनाथकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.