पांडुरंग विठ्ठलाच्या जयघोषात परिसरातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मांदियाळी बघायला मिळाली, विदर्भातील जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते लोक प्रति पंढरपूर असलेल्या कोंडण्यापुरामध्ये रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात,आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. तसेच कौंडण्यपुरातही भाविक दर्शनासाठी येतात. कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचे आणि पाच सतीचे माहेर आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर साठी रुक्मिणी मातेच्या माहेराहून गेलेली ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे. जे भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाही. ते आषाढी एकादशीच्या दिवशी कौंडण्यपूर येथे दर्शनासाठी येतात.