भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रकल्प पूर्ण होण्याआधीच धरणाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेली सुरक्षा भिंत कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेमुळे वासेवाडी, निंबा आणि अलनगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले असून, संभाव्य धोका लक्षात घेता तातडीने चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. निष्काळजीपणा आणि हलगर्जी कामामुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.