Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही

मुंबईत तर स्थिती आणखी गंभीर आहे. मुंबईतील केवळ ६३ टक्के मतदारांची माहिती डिजिटलाईज झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 13, 2026 | 08:08 AM
अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली

अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रीक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अद्याप सुमारे १ कोटी ८० लाख मतदारांचे गणना अर्ज जमा झालेले नाहीत. विहित मुदतीत त्यांनी अर्ज न भरल्यास त्यांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत तर स्थिती आणखी गंभीर आहे. मुंबईतील केवळ ६३ टक्के मतदारांची माहिती डिजिटलाईज झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. मतदारांनी स्वतःहून वेबसाईटवर तपासणी करावी, राजकीय पक्षांनीदेखील यादी तपासावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे. गणना अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट आहे.

बदल करण्याची मुभा

पात्र मतदारांचे नाव प्रारूप यादीत नसल्यास २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत फॉर्म ६ भरून नाव समाविष्ट करता येईल. १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही या कालावधीत अर्ज करता येणार आहे. काही बदल असेल तर फॉर्म ८ भरता येणार आहे.

मुंबईत केवळ ६३ टक्के माहिती प्राप्त

मुंबई शहर आणि उपनगरात केवळ ६३ टक्के मतदारांची माहिती डिजिटाईज झाली आहे. उर्वरित सुमारे २९ टक्के मतदारांचे गणना अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख मतदारांची नावे प्रारूप यादीत दिसणार नसल्याची शक्यता आहे. उर्वरित सात टक्के माहितीवर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही चोक्कलिंगम यांनी दिली.

पुण्यातील तब्बल ११ लाख मतदारांची नावे गायब होणार

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात दिलेल्या पत्त्यावर न आढळलेल्या सुमारे ११ लाख मतदारांची नावे २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदारांच्या अनुपस्थितीचे तीन वेळा पंचनामे करून ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

‘भूसंपादन गतिमान करा, उद्योगांना वेळेत जमिनी द्या!’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘वर्षा’ निवासस्थानावरील आढावा

Web Title: The names of 1 crore 80 lakhs voters in the state may be deleted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • Election Commission
  • political news

संबंधित बातम्या

Mamata Banerjee on Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार चोर, त्यांनी मते चोरली अन् EVM जाळली!; ममता बॅनर्जींचा ज्ञानेश कुमारांवर थेट हल्ला
1

Mamata Banerjee on Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार चोर, त्यांनी मते चोरली अन् EVM जाळली!; ममता बॅनर्जींचा ज्ञानेश कुमारांवर थेट हल्ला

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.