Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

निवडणूक आयोगाने पक्ष विकण्याच्या भूमिकेत दलालाची भूमिका बजावली. आयोगाने आतापर्यंत चार पक्ष विकले आहेत. भ्रष्टाचाराला पुरावे असतात का? पक्ष विकला, हाच पुरावा आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 13, 2026 | 01:07 PM
'आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील'; 'या' खासदाराने केलं मोठं विधान

'आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील'; 'या' खासदाराने केलं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना पक्षातील फूट, पक्षाचे नेतृत्व आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला आता महत्त्वाचे वळण मिळताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. त्यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ‘घटना सादर केल्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. पक्षाची घटना तयार करूनच पक्ष चालवला गेला. निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली हा पक्ष ५ हजार कोटी रुपयांना विकला. त्याचे आकडे आम्ही पुढील काळात देऊ, असे संजय राऊत म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘निवडणूक आयोगाने पक्ष विकण्याच्या भूमिकेत दलालाची भूमिका बजावली. आयोगाने आतापर्यंत चार पक्ष विकले आहेत. भ्रष्टाचाराला पुरावे असतात का? पक्ष विकला, हाच पुरावा आहे. हा निकाल आगामी काळात माईलस्टोन ठरेल. हा देश वाचवायचा असेल, तर सर्वोच्च न्यायालयाला कायद्याचे उल्लंघन झाल्याप्रकरणी तटस्थपणे निर्णय घ्यावा लागेल. समोरची बाजू सेटिंगवर आहे. आम्हाला प्रॉमिस आहे, असं समोरची बाजू सांगते. प्रॉमिस कोणाचं आहे, ते त्यांनी आधी जाहीर करावं. मग मी अमित शाह यांचं संसदेत बघतो’.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर संजय राऊत म्हणाले, अमित शाह खोटं बोलत आहेत. आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील, हे मी खूप धाडसाने सांगत आहे. अमित शाह यांचे हात काल लटपटत होते. शाह यांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि याला मोदींनी विरोध केला आहे. मोदींनंतर शाह नसतील, हे नक्की आहे. मोदी किती काळ टिकतील, हे माहीत नाही. पुढील आंदोलन ईव्हीएमविरोधी असेल. या देशातील तरुणांनी तसं ठरवलं आहे, ही माझी माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मराठी भाषा आलीच पाहिजे

मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केली आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ‘कोणत्याही राज्यात जाता, तिथली भाषा शिकली पाहिजे. दिल्लीत येऊन आम्ही हिंदीत बोललो नाही, तर काय होईल? महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी मराठी आली पाहिजे’, असेही त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

Web Title: Amit shah will not be part of the upcoming cabinet expansion says mp sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Amit Shah
  • MP Sanjay Raut
  • political news

संबंधित बातम्या

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
1

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान
2

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
3

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
4

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.