अमरावतीहून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आसेगाव पूर्णा ते दर्यापूर मार्गावर महिमापूर येथे ही विहीर संपूर्ण दगडाने बांधलेली आहे आणि तिचा आकार चौकोनी आहे. ही विहीर मुघलकालीन आहे, असा उल्लेख अमरावती जिल्ह्याच्या ‘गॅझेटियर’मध्ये आहे. स्थापत्यशैलीचा अजोड व अनोखा नमुना असलेली महिमापूरची ऐतिहासिक विहीर ही सातमजली आहे. या विहिरीचे छायाचित्र पोस्टकार्डवर झळकल्याने ही पायविहीर राष्ट्रीय नकाशावर आली आहे. राष्ट्रीय टपाल दिनाचे औचित्य साधून केंद्रीय टपाल विभागाने या विहिरीचा अनोखा सन्मान केला आहे. या विहिरीला भेट देऊन पर्यटक इतिहास तसेच स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ही विहीर नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत आली आहे. काही इतिहासकारांच्या मते, महिमापूर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळातील ही विहीर असल्याचे काही संशोधकांचे मत आहे.