१९ जून, १९६६ ला शिवसेनेची स्थापन झाली, मार्मिक साप्ताहिकातून अन्यायाच्या विरोधात लिखाण सुरु होते ते वाचून मी शिवसैनिक झालो माझ्यासारखे अनेक जण मार्मिक वाचूनच शिवसैनिक झाले आहेत अशा भावना व्यक्त केल्या आहेत शिवसेनशी सुरूवातीच्या काळापासून आजपर्यंत एकनिष्ठ असलेले पुण्यातील कोथरूडचे माजी आमदार आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी.
सुरुवातीच्या काळात शिवसैनिकांचे अतोनात हाल झाले मला तर शिवसेनेत काम करतो म्हणून दोन वेळा घरातून हाकलून दिले अनेक शिवसैनिकांना घरातूनच विरोध होता मात्र आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली नाही. महापालिका निवडणुकीत कोथरूड मध्ये शिवसेनेचा पहिला बूथ आम्ही लावला.नंतरच्या काळात बाळासाहेबांचे आणि माझे घरोब्याचे संबंध निर्माण झाले. येरवड्यात यशवंतराव चव्हाण यांची गाडी अडवली होती पोलिसांनी आम्हाला जेल मध्ये टाकले होते अशा अनेक अडचणीवर मत करत शिवसेनेचे काम करत राहिलो. बाळासाहेबाकडे काही मागायचे नसते त्यांना वाटलं तर ते न सांगता संधी देत असत.