बीड जिल्ह्यातील संतप्त शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला. अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही सरकारकडून ठोस मदत न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव द्यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हातात सोयाबीन, तूर आणि कापसाची रोपं घेऊन शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल आणि सोयाबीनला 7 हजार रुपये हमीभाव देण्याची ठाम मागणी करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.