अहिल्यानगरला ख्रिसमस निमित्त हजारो ख्रिस्त बांधवांनी ऐतिहासिक ह्युम मेमोरिअल चर्च मध्ये प्रार्थना करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नगर जिल्ह्यात ख्रिस्त संकृती खूप जुनी आहे या ठिकाणी अनेक जुने चर्च आहेत ह्यूम मेमोरियल हे 1833 साली स्थापन केलेल अतिशय जून चर्च आहे. या चर्चचे बांधकाम दगडांमध्ये करण्यात आल असून भारतीय संस्कृतीनुसार याची बांधणी करण्यात आली आहे. या चर्चला वरील बाजूस मनोरा ऐवजी घुमट आहे. अमेरिकेतून आणलेले बेंच हे या चर्चचे वैशिष्ट आहे. या बरोबरच अमेरिकेतून संपूर्ण भारतात केवळ ५ बेल पाठवण्यात आल्या होत्या त्यातील एक बेल या चर्च मध्ये आहे. त्यामुळे या चर्च मध्ये प्रार्थना करण्यासाठी राज्यातूनच नव्हे राज्याबाहेरून देखील भक्तगण येतात. आज येशु ख्रिस्त चा जन्मोत्सव असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांनी चर्च मध्ये गर्दी केली. चर्च मध्ये करण्यात आलेली सजावट आलेल्या भक्तगणांचे आकर्षण बनले. येशूची प्रार्थना करून आणि गीत गाऊन मोठ्या उत्साहात नाताळ हा सण साजरा करण्यात आला..