Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime : आधी चाकूचा धाक दाखवला आणि मग… ; किणीजवळ खासगी बसवर दरोडा

किणी तालुका ते हातकणंगले येथे कोल्हापूर भायखळा, मुंबई जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी आराम बसवर सोमवारी (दि. 22 ) मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी 7 ते 8 तरुणांनी चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 25, 2025 | 03:38 PM
Kolhapur Crime : आधी चाकूचा धाक दाखवला आणि मग… ; किणीजवळ खासगी बसवर दरोडा
Follow Us
Follow Us:
  • आधी चाकूचा धाक दाखवला आणि मग….
  • किणीजवळ खासगी बसवर दरोडा
पेठ वडगाव :  किणी तालुका ते हातकणंगले येथे कोल्हापूर भायखळा, मुंबई जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी आराम बसवर सोमवारी (दि. 22 ) मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी 7 ते 8 तरुणांनी चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला. अशोका ट्रॅव्हल्स कंपनीचची खासगी आराम बस कोल्हापूरहुन मुंबईला जाण्यासाठी रात्री अकराच्या सुमारास सुटली. ती तावडे हॉटेलवर आली असता तीन अनोळखी व्यक्ती प्रवासी म्हणून बसमध्ये बसले. तेथून बस वाठार (ता. हातकणंगले) येथे महामार्गावर आली असता किणी गावच्या हद्दीत बस मागून येणाऱ्या वाहनांतील 7 ते 8 साथीदारांच्या मदतीने त्यांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला.

यामध्ये 68 लाख रुपये किंमतीची सुतळी बारदानमधील 34 किलो चांदी, 52 लाख रुपये किंमतीचे पांढऱ्या रंगाचे बारदानचे पॅकिंग असलेले पार्सल, त्यामधील २६ किलो चांदी, 2 लाख किमतीचे मशनरीचे स्पेअरपार्ट व 10 ग्रॅम सोने,10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, 5 हजार रुपये किंमतीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1 कोटी 22लाख 15हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना

भीतीने चालकाने गाडी सांगली जिल्ह्यातील कणेगाव याठिकाणी थांबऊन 112 क्रमांकावर घटनेची माहिती दिली, तत्काळ सांगली पोलिस बस जवळ पोहोचले, त्यांनी पेठवडगाव पोलिसांना माहिती दिली. बसमध्ये असणारे प्रवासी दुसऱ्या बसने मुंबईला पाठवून ती बस पेठवडगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस स्टेशनचे पथक, गुन्हेशोध पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत.

बँकेलाच गंडवले! बनावट कागदपत्रे सादर करत लावला तब्बल 82 लाखांचा चुना

एकीकडे कोल्हापूर तर दुसरीकडे जावळीमध्ये देखील दरोडेखोरांनी एका महिलेला लुटण्याचा प्रयत्न केला. जावळी तालुक्यातील कुडाळ परिसरात सोमवारी मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी सशख दरोड्याचा प्रयत्न केला. दरवाजा तोडण्यास विरोध करताना दरोडेखोरांनी महिलेवर चाकूने वार केला. यात महिला गंभीर जखमी झाली. धनश्री कदम असे त्यांचे नाव आहे. सोमवारी रात्री कुडाळजवळील पुनर्वसित पानस गावात दरोडेखोरांनी बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच हाती न लागल्याने त्यांनी कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांच्या शेतातील घरात चोरीचा प्रयत्न केला. तेथेही अपयश आल्याने त्यांनी तानाजी कदम यांच्या घराकडे मोर्चा वळवला. घरात तानाजी कदम, त्यांची पत्नी धनश्री आणि मुलगी होती.

दरोडेखोरांनी लाथा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. दरवाजा कोसळण्याच्या बेतात असतानाच तानाजी कदम यांच्या पत्नी धनश्री यांनी तो रोखला. याचवेळी तानाजी कदम यांनी स्वसंरक्षणासाठी हातात फावडे घेतले. हे पाहून दरोडेखोरांनी थेट धनश्री यांच्यावरच हल्ला चढवत हातावर चाकूने वार केले. याचवेळी तानाजी कदम यांच्या मुलीने शेजाऱ्यांना फोन करून मदतीसाठी बोलावल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Nashik Crime: ऑनलाईन हॉस्पिटलचा नंबर शोधणे पडलं महागात! सायबर भामट्यांनी नाशिकमध्ये दोन जणांना लावला लाखांचा चुना

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: किणीजवळ खासगी बसवर दरोडा कधी आणि कुठे टाकण्यात आला?

    Ans: सोमवारी (दि. 22) मध्यरात्रीच्या सुमारास किणी (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत कोल्हापूर–भायखळा, मुंबई जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या खासगी आराम बसवर दरोडा टाकण्यात आला.

  • Que: दरोडा कसा टाकण्यात आला?

    Ans: तावडे हॉटेल येथे प्रवासी म्हणून तीन जण बसमध्ये चढले. पुढे किणी हद्दीत बस मागून आलेल्या साथीदारांच्या मदतीने त्यांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला.

  • Que: 6) घटनेनंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: भीतीने चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे बस थांबवून 112 क्रमांकावर माहिती दिली. सांगली व पेठवडगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी व पोलिस ठाण्यात कारवाई सुरू केली. गुन्हेशोध पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.

Web Title: Kolhapur crime first they threatened him with a knife and then robbery on a private bus near kinni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • crime news
  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’
1

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!
2

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट
3

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय
4

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.