बीड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गचक्राच्या संकटात अडकला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने उभ्या फळबागेसह शेतजमीनही खरडून वाहून गेल्याने आता पीक घ्यायचं कुठं ? आणि जगायचं कसं ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय.बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाली गाव परिसरातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे, अचानक नदीने पात्र बदललं आणि शेतालाही आपल्या कवेत सामावून घेतलं. यामुळे शेतकऱ्याच्या उभ्या डाळिंब, लिंबू या फळबागेसह बोअर, मोटारी, शेततळे अन् जमीनही खरडून वाहून गेली आहे.