भिवंडी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीतील घटक पक्षांकडून कोणतीही विचारणा होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीत पक्षाकडून ३५ ते ४० उमेदवार मैदानात उतरणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिली. पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार असून त्यामध्ये ९ माजी नगरसेवकांचा समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.