बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव, आसा दुधा शिवारातील अनुसूचित जातीतील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदली आहे, त्यासाठी राज्य सरकारकडून अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते, मात्र तीन महिने उलटूनही अनुदान मिळाले नाही, या शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून विहिरीचे खोदकाम केले आणि अनुदानासाठी संबंधित कार्यालयामध्ये चकरा मारून ही अनुदान मिळत नसल्याने, संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेत तात्काळ अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.. अन्यथा कार्यालयातच आत्महत्येचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.