आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने देशात एलपीजी गॅस तुटवडा असल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे नागरिक सिलेंडर भरून ठेवण्यासाठी गॅस एजन्सीवर भल्या पहाटे उठून रांगा लावत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे गॅस सिलेंडर साठी मोठी गर्दी होत असल्याने पोलिसांना बोलवण्यात आले आणि पोलिसांच्या बंदोबस्तात आता सिलेंडर वितरण केले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बुलढाणा शहरातील एचपी गॅस गोडाऊन समोर नागरिकांनी गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी रात्री चार वाजेपासूनच रांगा लावल्या असल्याचे चित्र आहे. आज रमजान ईद असून सणासुदीच्या काळात देखील नागरिक गॅस सिलेंडर साठी रांगेत उभे असल्याचे बघायला मिळाले गॅस गोडाऊन वर एलपीजी गॅस उपलब्ध असून सुद्धा नागरिकांना ते मिळेल किंवा नाही या भीतीपोटी स्वतःच रांगा लावत आहेत तर एलपीजी गॅस सिलेंडरचे व्यवस्थापक गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळेल असे सांगत असले तरी नागरिक मात्र मोठ्या संख्येने गोडाऊन वर रांगा लावत असल्याचे चित्र आहे