बुलढाणा गृह विभागाने तीन जून रोजी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या यामध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची देखील बदली करण्यात आली होती परंतु हा निर्णय अन्याकारक असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी हे प्रकरण कॅटमध्ये दाखल केले त्याने स्थगिती दिल्यानंतर आज नऊ जून रोजी या प्रकरणाचा निकाल येणार आहे आणि खऱ्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्याचे एसपी कोण हे ठरणार आहे.
२२ मे २०२५ रोजी गृह विभागाने विश्व पानसरे यांची बदली अमरावती येथे करत त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नेमणूक बुलडाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी केली होती. मात्र पानसरे यांनी ही बदली अचानक व कारणांशिवाय झाल्याचा दावा करत ‘कॅट’मध्ये न्याय मागितला. कॅटने त्यांच्या याचिकेवर सुनावणी करत सरकारच्या बदली आदेशावर तात्पुरती स्थगिती दिली आणि पुढील सुनावणीसाठी ९ जून ही तारीख निश्चित केली होती.