पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्यानंतर राज्यभर विरोधक आक्रमक झाले असून, त्याच पार्श्वभूमीवर आज मीरा-भाईंदर शहरात काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाईंदर (पश्चिम) येथील उपनिबंधक (रजिस्टर) कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “मुद्रांक शुल्क घोटाळा थांबवा” आणि “सत्ताधारी जनता लुबाडत आहेत” अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी पार्थ पवार यांच्यावर आरोप करत, त्यांनी मुद्दाम मुद्रांक शुल्कात मोठ्या प्रमाणावर घोटाळा केल्याचा दावा केला.