Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: संसदेतील बारामतीचा नवा ‘पवार’ पॅटर्न; आजोबा अन् नातू एकाचवेळी राज्यसभेवर

एका टर्मला शरद पवार माढ्यातून तर सुप्रिया सुळे बारामतीतून एकाच वेळी लोकसभेवर निवडून गेले. शरद पवार केंद्रातून राज्यात आल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अजित पवार लोकसभेवर निवडून गेले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 09, 2026 | 03:26 PM
Baramati Politics, Sharad Pawar, sunetra Pawar, Parth Pawar,

Baramati Politics, Sharad Pawar, sunetra Pawar, Parth Pawar,

Follow Us
Close
Follow Us:
  • बारामतीचं पवार घराणं नेहमीच राज्यासह केंद्राच्या राजकारणात केंद्रस्थानी
  • शरद पवार तर महायुतीतून पार्थ पवार एकाचवेळी एकाच सभागृहात
  • सध्या एकाच घरात उपमुख्यमंत्री, लोकसभेचा एक, राज्यसभेचे तीन खासदार व विधानसभेचा एक आमदार
संदीप पाटील- पुणे: सत्तेत असो वा नसो बारामतीचं पवार घराणं नेहमीच राज्यासह केंद्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलं आहे. चार खासदार, एक उपमुख्यमंत्री, एक आमदार असलेल्या घराण्याचा पॉवरप्ले राज्यसभा निवडणुकीत दिसून आला. एकाचवेळी आजोबा व नातू संसदेच्या वरीष्ठ सभागृहात गेल्याने बारामती पुन्हा चर्चेत आली आहे. बापलेकीसह मायलेक संसदेत जाण्याचा विक्रम पवार घराण्याने केला आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांसाठी सातच उमेदवार राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. अपेक्षेप्रमाणे भाजपाचे चार, शिवसेना शिंदे गटाचा एक. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक, राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचा एक उमेदवार बिनविरोध झाला आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार सातपैकी सहा महायुती व एक जागा महाविकास आघाडील मिळाली. सात सदस्यात बारामतीच्या पवार घराण्यातील दोघेही आहेत. महाविकास आघाडीच्या कोट्यातून शरद पवार तर महायुतीतून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) एकाचवेळी एकाच सभागृहात जाण्याचा योगायोग जुळून आला.

Wardha Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ५ वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार; अश्लील फोटोही पाठवले

शरद पवार राज्यसभेवर तिसऱ्यांदा तर पार्थ पवार पहिल्यांदा जात आहेत. शरद पवार लोकसभेवर सातवेळा तर विधानसभेवर सहावेळा निवडून गेले आहेत. पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून एकदा निवडणूक लढविली. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. बारामतीच्या विद्यमान खासदार व शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे चार वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

एका टर्मला शरद पवार (Sharad Pawar) माढ्यातून तर सुप्रिया सुळे बारामतीतून  एकाच वेळी लोकसभेवर निवडून गेल्या. शरद पवार केंद्रातून राज्यात आल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अजित पवार लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आठवेळा विजय मिळविला.  पण त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणारी पोटनिवडणूक पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लढवू शकतात. सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्या होमग्राऊंडवर अर्थात बारामती विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याला पसंती देतील. शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

बारामतीतल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची थेट नागपूर कारागृहात रवानगी, MPDA कायद्यांतर्गत १ वर्षासाठी जेल

संसद, विधीमंडळातील प्रतिनिधित्व

सध्या एकाच घरात उपमुख्यमंत्री, लोकसभेचा एक, राज्यसभेचे तीन खासदार व विधानसभेचा एक आमदार आहे. बापलेकीसह आजोबा-नातू एकाचवेळी संसदेत असण्याचा देशाच्या राजकारणातील दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. लोकसभा असो, राज्यसभा असो अथवा विधानसभा गेल्या ६० वर्षात पवार घराण्यातील सदस्याने सलग प्रतिनिधित्व केले आहे.

 

शरद पवारांची अखंडित कारकिर्द

शरद पवार यांनी संसदीय कारकिर्दीची सहा दशके पूर्ण केली आहेत. लोकसभा, राज्यसभा किंवा विधानसभेत प्रतिनिधित्व करताना खंड पडला नाही. त्यांनी लोकसभा व विधानसभेच्या सर्व निवडणुका जिंकल्या तर राज्यसभेवर सलग तीनवेळा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला.   वयाच्या २७ व्या पहिल्यांदा आमदार, ३२ व्या वर्षी राज्यमंत्री तर वयाच्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. देशात प्रदीर्घ काळ संसदीय कारकिर्द गाजविणारे राजकारणी म्हणून पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी सुमारे २८ वर्षे खासदार म्हणून आणि साधारण २५ वर्षे आमदार/मुख्यमंत्री म्हणून लोकसेवेची जबाबदारी पार पाडली आहे.

 

Web Title: Baramatis pawar pattern in parliament grandfather sharad pawar and grandson parth pawar in rajya sabha simultaneously

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • Baramati Politics
  • parth pawar
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी…
1

बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी…

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज
2

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत
3

वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

“हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे…”; अजितदादांच्या आठवणींने सुनीलकुमार मुसळे भावूक
4

“हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे…”; अजितदादांच्या आठवणींने सुनीलकुमार मुसळे भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.