स्वयंपाक घरामध्ये गृहिणींना लसणाची फोडणी दिल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. गेल्या काही दिवसांपासून लसणाची भाव हे गगनाला भिडले होते. मात्र आता गेल्या आठ दिवसांमध्ये लसणाची भाव कमी झाले आहेत. त्यामुळे स्वयंपाक घरात काम करणाऱ्या गृहिणींना देखील दिलासा मिळाला आहे. एपीएमसी बाजारामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये लसणाच्या दरामध्ये पन्नास रुपयांची घसरण झाली आहे. सध्या दोनशे वीस रुपये किलोने लसूण विकले जात आहेत. पुढील काही दिवस सुद्धा लसणाचे भाव कमीच राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.