Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

आंदोलन करण्यासाठी पैसे भरावे लागतात. आपलं मत मांडण्यासाठीही पैसे द्यावे लागत असतील, तर ही हुकूमशाहीच आहे. देशात आपलं मत मांडण्याचा अधिकार नसेल, तर नरेंद्र मोदी यांचं सरकार हुकूमशाही चालवत आहे, असंच म्हणावं लागेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 15, 2026 | 02:59 PM
पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? नाना पटोले यांचा सरकारला सवाल

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत
  • आंदोलन करण्यासाठी पैसे भरावे लागतात
  • …तर नरेंद्र मोदी यांचं सरकार हुकूमशाही चालवत आहे
नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.१४) दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपयांची आगाऊ आर्थिक मदत जमा करण्याची घोषणा केली. यावरून काँग्रेसकडून टीका केली जात आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पाच हजारांत शेतकरी कसा जगणार? असा सवाल उपस्थित केला.

नाना पटोले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मी वारंवार सांगतो की, भाजप शेतकरीविरोधी आहे. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पुरावे देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वस्तुस्थिती समजू लागली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. काल सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी अॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाच हजार रुपयांत नेमकं काय होणार, हे सांगता येत नाही. किमान वीस हजार रुपये तरी दिवाळी अॅडव्हान्स म्हणून दिले असते, तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळाला असता’, असे त्यांनी सांगितले.

तसेच सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे. खतांच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. शेतकऱ्यांची लूट करणारं हे सरकार आहे, हे देशासमोर दिसत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

देशद्रोही म्हणजे नेमकं कोण?

देशात जनतेला, इम्रान खान, नाईक यांना किंवा सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवायचं की नाही, हे सरकारमध्ये बसलेले लोक ठरवतात. देशद्रोही म्हणजे नेमकं कोण? माझा आरोप आहे की, एसआयआरच्या नावाखाली देशातील ३२ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. लोकांचं व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे. जे लोक देशाचं संविधान मानत नाहीत, असे लोक संविधानिक पदांवर बसले आहेत. अशा लोकांना देशद्रोही म्हणायचं का?

…तर ही हुकूमशाहीच आहे

आंदोलन करण्यासाठी पैसे भरावे लागतात. आपलं मत मांडण्यासाठीही पैसे द्यावे लागत असतील, तर ही हुकूमशाहीच आहे. देशात आपलं मत मांडण्याचा अधिकार नसेल, तर नरेंद्र मोदी यांचं सरकार हुकूमशाही चालवत आहे, असंच म्हणावं लागेल.

बच्चू कडू यांचे पदवीधर मतदारसंघाबाबतच्या विधानावर म्हणाले…

मला त्या विषयावर बोलायचं नाही. कोण कसं बोलतं, यावर मला विधान करायचं नाही. लोकांच्या आशीर्वादाने आणि आमच्या कामाच्या जोरावर आम्हाला निवडून द्यावं, ही आमची अपेक्षा आहे. उमेदवार लोकांपर्यंत जात आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे होत असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Drought 2026 : बळीराजाची दिवाळी गोड होणार ! शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांची मदत; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

💡 Frequently Asked Questions
  • Que : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये कधी मिळणार?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची आगाऊ आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, रक्कम जमा होण्याची निश्चित तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

  • Que: शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत कोणत्या निकषांवर मिळणार?

    Ans: दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, लाभार्थी निश्चितीचे सविस्तर निकष अधिकृत शासन निर्णयानुसार स्पष्ट होतील.

  • Que: महाराष्ट्रातील किती तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे?

    Ans: महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यानंतर आणखी ४० तालुक्यांचा समावेश केल्याने एकूण ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Nana patole questions government over the 5000 rupee aid nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nana patole
  • political news

संबंधित बातम्या

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर
1

जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे गटाची बाजी; राजापूरे दाम्पत्याचे अर्ज बाद झाल्याने संजय शिंदेंचा बिनविरोधाचा मार्ग सुकर

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
2

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
3

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
4

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.