सुरत – नागपूर महामार्गावरील बायपास पूल खचल्याने जळगाव शहरातून वाहतूक वळवण्यात आली आहे. जळगाव शहरातून वाहतूक वळवल्यामुळे गेल्या अडीच महिन्यात बारा जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी कार्यालयात वेळेत न पोहोचल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या खुर्चीलाच हार घालत निषेध व्यक्त केला. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.