यंदा पावसाने दिलेल्या दीर्घ खंडाचा थेट परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला असून, शेतकऱ्यांच्या हाती अत्यंत कमी उत्पन्न येत आहे. सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असली, तरी एकरी अवघी दोन ते तीन पोती उत्पादन होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडे चार ते पाच एकरांतून केवळ २६ कट्टे, म्हणजेच सुमारे १२ ते १३ क्विंटल सोयाबीन उत्पादन होत आहे. दरवर्षी ४० ते ४२ क्विंटल उत्पादन मिळणाऱ्या या शेतकऱ्याला यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून केवळ 5 हजार रुपयांची मदत नको, तर हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.