कोल्हापुरात खड्डेमय रस्त्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने खड्यांची दिवाळी साजरी करण्यात आली.दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील खड्ड्यात पणत्या आणि फटाके लावून निषेध आंदोलन करण्यात आलं..शिवाय रस्त्यावर रांगोळी देखील काढण्यात आली होती..याशिवाय आंदोलकांनी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला..त्यामुळे दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी रात्री बारा वाजता झालेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे..या आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.