Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: सिंदेवाहीत वाघाची दहशत! आठवडाभरात तिघांचा बळी, तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

नवरगाव उपवन क्षेत्रात अवघ्या आठवड्याभरात दोन पुरुष आणि एका महिलेवर वाघाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2026 | 01:53 PM
Chandrapur News: सिंदेवाहीत वाघाची दहशत! आठवडाभरात तिघांचा बळी, तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Chandrapur News: सिंदेवाहीत वाघाची दहशत! आठवडाभरात तिघांचा बळी, तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • वनविभागाच्या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप
  • आठवडाभरात वाघाच्या हल्ल्यात एकापाठोपाठ एक तिघांचा मृत्यू
  • शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट
नवरगाव: सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवन क्षेत्रातील धुमनखेडा येथे शुक्रवारी वाघाच्या हल्ल्यात रामाजी मेश्राम (७५, रा. धुमणखेडा) याचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची ही तिसरी घटना असल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली. वनविभागाच्या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Mumbai News: संस्थाचालकांना लगाम; शिक्षक भरती होणार पारदर्शक! ३ ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती, कौशल्य चाचणी

विशेष म्हणजे सिंदेवाही तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला. आठवडाभरात वाघाच्या हल्ल्यात एकापाठोपाठ एक अशा तिघांचा मृत्यू झाला. यापूर्वी पहिली घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. ज्यामध्ये पळसगाव (जाट) येथील नानाजी नारायण कामडी (५५) हे शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर भीषण हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच २५ ऑक्टोबर रोजी दुपारी भेंडाळा शेतशिवारात तीळ कापत असलेल्या अंगणवाडी सेविका प्रेमीला पुंडलिक महाडोरे (५६, रा. भेंडाळा) यांच्यावर वाघाने झडप घालून त्यांना जागीच ठार केले होते. (फोटो सौजन्य: Pinterest) 

तिसऱ्या घटनेत सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवन क्षेत्रातील धुमनखेडा येथे शुक्रवारी वाघाच्या हल्ल्यात रामाजी मेश्राम (७५, रा. धुमणखेडा) याचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या आठवड्याभरात दोन पुरुष आणि एका महिलेसह तिघांना वाघाने आपले भक्ष्य बनवल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

शेतात धानकापणी आणि इतर मशागतीची कामे सुरू असताना सातत्याने होणाऱ्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे शेतात जाणेही धोक्याचे बनले आहे. या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा आणि पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आता संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

सध्या शेतातील विविध कामांचा हंगाम सुरू असून, शेतक-यांना दररोज शेतात जावे लागते. मात्र, परिसरात वाधाचा वावर वाढल्याने शेतात जाणेही धोकादायक बनले, वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नवरगाव परिसरातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, त्यासाठी पिंजरे लावणे, नियमित गस्त वाढविणे, आवश्यक ठिकाणी कॅमेरे लावणे तसेच वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी तातडीने विशेष पथक तैनात करावे. ४८ तासांच्या आत वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी. अन्यथा, नागरिकांना सोबत घेऊन वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल.- राहुल बोडणे, अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, नवरगाव

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Tiger attack in sindewahi 3 people killed within a week in chandrapur hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

JSW Combat SUV Launch in India: रेंज पाहून थक्क व्हाल! JSW च्या Combat SUV चं इंटिरिअर लॉन्चपूर्वीच चर्चेत
1

JSW Combat SUV Launch in India: रेंज पाहून थक्क व्हाल! JSW च्या Combat SUV चं इंटिरिअर लॉन्चपूर्वीच चर्चेत

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर
2

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर

Nagpur News : सायबर फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त; ८ आरोपी अटकेत
3

Nagpur News : सायबर फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त; ८ आरोपी अटकेत

Farmers Water Protest: राज्यातील धरणांच्या पाण्याच्या साठ्याची परिस्थिती गंभीर; राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
4

Farmers Water Protest: राज्यातील धरणांच्या पाण्याच्या साठ्याची परिस्थिती गंभीर; राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.