रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने रागाच्या भरात काकासाहेब यांनी ७ ऑगस्ट रोजी शेतातच आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकला. या घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू झाला. आई आणि मुलांमध्ये शेतजमीन विकण्यावरून वाद असल्याची माहिती मिळाली. मुलगा काका साहेबाचा शोध सुरू झाला. मात्र काकासाहेबांचा तपास लागला नाही. रेणापूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधव यांचा मृतदेह आढळून आल आहे.मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रेणापूर पोलिस पुढील तपास करत आहेत. या दुर्देवी घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.