
आरोग्य, शिक्षण अन् पर्यावरण क्षेत्रात मोठे परिवर्तन; 'माझी वसुंधरा अभियाना'त पालघरच्या नावझे गावाचा गौरव
गावाच्या या विकासप्रवासाला सोसायटी फॉर ह्युमन अँड एन्व्हायर्नमेंटल डेव्हलपमेंट (शेड) सोबत सहयोगाने राबवण्यात येणाऱ्या रोश डायग्नोस्टिक्स इंडियाचा प्रमुख सीएसआर उपक्रम प्रोजेक्ट रोशनीचे पाठबळ मिळाले आहे. २०१५ पासून या उपक्रमाने महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील १,००० हून अधिक लाभार्थी कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
नावझे गावात ४३५ कुटुंबांमधील जवळपास १,९९८ लोक आणि नऊ पाडे आहेत. येथील जवळपास ८० टक्के लोकसंख्या आदिवासी व कातकरी समाजाची आहे. या उपक्रमापूर्वी गावाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता, ज्यामध्ये दर्जेदार आरोग्यसेवेचा अभाव, महिलांमधील ॲनिमिया, बाल कुपोषण, शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा आणि उपजीविकेतील हंगामी अनिश्चितता यांचा समावेश होता. या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रोजेक्ट रोशनीने आरोग्य व पोषण साहाय्य, शैक्षणिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि शाश्वततेवर आधारित उपाययोजना राबवल्या.
आरोग्य विभागांतर्गत महिलांचे आरोग्य आणि पोषण हे प्रमुख केंद्रित क्षेत्र राहिले आहे. या उपक्रमामुळे गेल्या १० वर्षांत जवळपास ३० टक्के महिलांच्या हिमोग्लोबिनच्या पातळीत सुधारणा झाली आहे, तसेच त्यांना नियमित उपचार आणि पोषणाचे मार्गदर्शन मिळत आहे. शिक्षण क्षेत्रात या उपक्रमाने शाळा सोडण्याचे प्रमाण (ड्रॉपआउट रेट) २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे आणि मुलींना शाळेत टिकवून ठेवण्यास व पुढील शिक्षण घेण्यास यशस्वीपणे प्रोत्साहन दिले आहे.
या प्रगतीबाबत मत व्यक्त करत सरपंच दामोदर सुकार्या लबाड म्हणाले, “नावझेमध्ये आम्ही पिढ्यान्पिढ्यांच्या परिवर्तनाचा पाया रचला आहे. पर्यावरणीय जलसुरक्षा, डिजिटल-फर्स्ट शिक्षण आणि सर्वांगीण कौटुंबिक आरोग्यसेवेची सांगड घालून आम्ही शाश्वत आणि प्रगतीशील गाव घडवत आहोत. महिलांच्या आरोग्यात आणि मुलांच्या आकांक्षांमध्ये गुंतवणूक करणे केवळ आजच्या गरजा पूर्ण करत नाही, तर ते सक्षम आणि प्रबळ भविष्य सुनिश्चित करते, जे आमच्या समाजाला पिढ्यान्पिढ्या समृद्ध करेल.”
प्रोजेक्ट रोशनीमागील रोशच्या दृष्टीकोनाबाबत मत व्यक्त करत रोश डायग्नोस्टिक्सच्या कम्युनिकेशन्स आणि सीएसआर विभागाच्या उपाध्यक्षा प्रियदर्शिनी शर्मा म्हणाल्या, रोशमध्ये शाश्वतता आमच्या मूळ उद्देशाशी जोडलेली आहे, ते म्हणजे रुग्णांना भविष्यात कशाची गरज भासणार आहे, त्यावर आजच काम करणे. स्थानिक प्रशासनासोबत काम करून आणि ग्रामस्थांचे विचार प्रत्यक्ष ऐकून घेऊन त्यांचा उद्याचा दिवस अधिक चांगला व्हावा यासाठी प्रोजेक्ट रोशनीद्वारे आम्ही ही कटिबद्धता प्रत्यक्षात आणतो.
त्यांनी पुढे सांगितलं की, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नावझे गावाला मिळालेली ही ओळख आमच्या सहयोगात्मक प्रयत्नांना नवी ऊर्जा देणारी आहे, तसेच संवेदनशील आणि तळागाळातील सहयोगातून काय साध्य होऊ शकते हेच यातून दिसून येते. या प्रकल्पाने निर्माण केलेल्या सामूहिक प्रभावाचा रोश डायग्नोस्टिक्स इंडियाला अत्यंत अभिमान आहे आणि आम्ही लोकसहभागातून शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.
याबाबत आपले मत व्यक्त करत शेडचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) राजेंद्र तावडे म्हणाले, शेडमध्ये आमचा विश्वास आहे की, प्रत्येक बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि पोषणाची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला, विद्यार्थी आणि कुटुंबांना निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि चांगल्या सवयींनी सक्षम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
राजेंद्र तावडे म्हणाले की, आम्ही शालेय मुले आणि महिलांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा व पोषण जनजागृती वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण सीएसआर पाठबळ दिल्याबद्दल रोश डायग्नोस्टिक्स इंडियाचे मनापासून आभार मानतो. अशा अर्थपूर्ण सहयोगामुळे आम्हाला व्यक्तींच्या जीवनात दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव घडवून आणणे शक्य होते. आम्ही हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनापासून सहयोग केल्याबद्दल शाळा प्रशासन आणि वैद्यकीय टीमचे देखील आभार मानतो.
Ans: पालघर जिल्ह्यातील नावझे या आदिवासी गावाला महाराष्ट्र शासनाच्या 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत सन्मानित करण्यात आले आहे.
Ans: शाश्वत विकास, लोकसहभाग, आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय प्रयत्नांमुळे गावाला हा सन्मान मिळाला आहे.
Ans: नावझे गावात ४३५ कुटुंबे असून जवळपास १,९९८ लोक राहतात. गावात एकूण नऊ पाडे आहेत.