मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत कोंडी गावा जवळ मराठा आंदोलकांनी जोरदार आंदोलन केले. आंदोलनादरम्यान काही आंदोलक तब्बल २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले. टाकीवरून घोषणाबाजी करत सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात संतापाची भावना निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. या संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेतला आहे ‘नवराष्ट्र’चे प्रतिनिधी विशाल भांगे यांनी.