माथेरान शार्लोट लेक हा तलाव खोडाला आणि पाणी साठवून ठेवण्याचे काम केले. ब्रिटिशांनी बांधलेल्या या शार्लोट लेकची साफसफाई माथेरान नगरपरिषद कडून मागील काही वर्षे करण्यात आली नाही.पिण्याच्या पाण्याचे दृष्टीने माथेरान शहरातील हा शार्लोट लेक महत्वाचा आहे.दरवर्षी पावसाळा सुरु होण्यासाठी माथेरान पालिकेकडून तलावातील कचरा उचलण्याचे काम सफाई कामगार यांच्याकडून करून घेतले जाते. २०१४ मध्ये नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान कडून हजारो श्री सदस्य यांच्या माध्यमातून शार्लोट लेक ची साफसफाई करण्यात आली होती. त्यानंतर पुढे दहा वर्षेचा कालावधी लोटला आहे.मात्र पालिकेने या तलावाची स्वच्छता केलेली नाही.दोन वर्षांपूर्वी तारीख निश्चित करण्यात आली होती,मात्र नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने आडकाठी केल्यानंतर ऐन पावसाळ्यात शार्लोट लेक मधील गाळ काढण्याचे काम रद्द झाले होते.त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तलावातील गाळ काढण्याची मागणी लावून धरली होती.