Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत

रायगडच्या खोपोलीत नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी 9 आरोपी अटकेत आहेत. आमदार महेंद्र थोरवेंनी या हत्येला ‘बीड कनेक्शन’ असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 30, 2025 | 09:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबरला खोपोलीत निर्घृण हत्या; सीसीटीव्ही व्हिडीओ समोर
  • रायगड पोलिसांकडून 9 आरोपी अटक; तपासाला वेग
  • आमदार महेंद्र थोरवेंचा ‘बीड कनेक्शन’चा आरोप; राजकीय वातावरण तापले
रायगड: रायगडच्या खोपोलीतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. मंगेश काळोखे हे खोपोलीच्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलाच तापलं असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. २६ डिसेंबरला मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलिसांनी ९ आरोपीला अटक केली आहे. आता कर्जत- खालापूर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येचं बीड कनेक्शन असल्याचा थेट आरोप थोरवे यांनी केला आहे.

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

आमदार महेंद्र थोरवे काय म्हणाले नेमकं?

आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी बोलतांना खळबळजनक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मंगेशच्या परिवाराने अजून एक धक्कादायक बातमी सांगितलेली आहे. रवी देवकरचा जो बॉडिगार्ड आहे, त्या आरोपीने मंगेशवर जवळ जवळ 13 वार एकट्याने केले आहेत. जर आपण फुटेजमध्ये पाहिलं, तर रवी देवकरच्या एकट्या बॉडीगार्डने तेरा वार केले आहेत. तो बॉडीगार्ड वाल्मिक कराडचा साथीदार आहे. वाल्मिक कराडच्या पेजवर त्याचं नाव आहे. त्याच्या ग्रुपवर त्याचं नाव आहे. अशा पद्धतीने तो धनंजय मुंडे, गडावरचे पण फोटो आहेत. त्यासंबंधीत सर्व फोटो आम्हाला मिळालेले आहेत.याचा अर्थ तो बाहेरचा भैय्या नाही. तर तो बीडमधीलच गुन्हेगार आहे. तो तिथला वॉन्टेड असून रवी देवकराने त्याला ही हत्या करण्यासाठी आणलेलं होतं. हे सर्व राष्ट्रवादी कनेक्शन आहे”

आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला इशारा

“धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आता हा रवी देवकरने आणलेला बॉडीगार्ड आहे, हा बीडचाच असल्याने मंगेशची क्रुरपणे हत्या करण्यात त्याचा सहभाग सर्वात मोठा आहे. अशा पद्धतीचं हे कृत्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. सुनील तटकरेंनी कर्जतमध्ये येऊन त्यांना पाठबळ देण्याचं काम केलं आहे. त्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे करत आहेत. आमची पोलीस प्रशासनाला विनंती राहील की आपण त्या आरोपींना तात्काळ अटक करावी, नाहीतर उद्या कँडल मार्च झाल्यानंतर आम्ही सर्व पोलीस स्टेशनलाच बसून राहू”, असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

रविंद्र परशुराम देवकर,दर्शन रविंद्र देवकर,धनेश रविंद्र देवकर,उर्मीला रविंद्र देवकर,विशाल सुभाष देशमुख,महेश शिवाजी धायतडक,सागर राजु मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार (उर्मिला देवकर यांचा भाऊ), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Mumbai Cyber Fraud: आता चोरांनी थेट हद्दच केली पार! सरन्यायाधीशांच्याच नावाचा केला वापर; महिलेची ३ कोटी ७५ लाखांची ऑनलाइन लूट

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कधी आणि कुठे झाली?

    Ans: 26 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे.

  • Que: या प्रकरणात किती आरोपी अटकेत आहेत?

    Ans: एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • Que: बीड कनेक्शनचा आरोप कोणी केला?

    Ans: शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी.

Web Title: Raigad crime the mangesh kalokhe murder case in khopoli has a beed connection mla mahendra thorve makes a sensational allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह
1

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल
2

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल

Nandurbar Crime: आदिवासी आश्रम शाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार! मुख्याध्यापकासह महिला अधीक्षक निलंबित
3

Nandurbar Crime: आदिवासी आश्रम शाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार! मुख्याध्यापकासह महिला अधीक्षक निलंबित

Noida Crime: चेहरा जळालेला, हात पाय बांधलेले, बॅगमध्ये तरुणीचा…; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर आढळला मृतदेह
4

Noida Crime: चेहरा जळालेला, हात पाय बांधलेले, बॅगमध्ये तरुणीचा…; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.