आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, सहसंपर्कप्रमुख दीपक गवते, जिल्हाप्रमुख पंडित माळी, यासह जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभी असलेली संघटना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना पुढे जात आहे. प्रत्येक प्रभागात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत. राज्यात महाआघाडी एकत्र असून जिल्ह्यातही आपण घटक पक्षांची आघाडी करण्यासंदर्भात चर्चा केली आहे परंतु काँग्रेस व सहयोगी पक्षांनी सन्मानपूर्वक जागा दिल्या तर महाआघाडी म्हणून निवडणुका लढवू नाहीतर चारही नगरपालिका वर स्वतंत्र नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे उमेदवार उभे करून निवडणूकीला सामोरे जाऊ. शिवसेनेमध्ये स्वतंत्र लढण्याची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.