फोटो सौजन्य सोशल मिडिया
Nandurbar Water Crisis : नंदुरबार जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. प्रशासनाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यातील 622 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, ज्यापैकी 100 हून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू शकते. बैठकीत अधिकाऱ्यांना ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत प्रलंबित प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या, निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या, तसेच हँडपंप बसवणे आणि विहिरींमधून पाणी उपलब्ध करून देणे यांसारखे उपाय योजण्याच्या सूचना देण्यात आल्या. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन टप्प्याटप्प्याने कृती आराखडा तयार करत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भिषण पाणी टंचाईचे सावट वाढल्याने गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील नदी नाले ओस पडले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी मोठी पाय पिट करावी लागत आहेत. याचा फटका शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेला बसत आहे. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार विधान सभेचे आमदार विजकुमार गावीत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यासाठी काय उपाय योजना करता येतील यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्यात सरकारने दुष्काळ झाहीर केला असून गेले दोन महिन्या पासून राज्यात पाऊस गायब असल्याने नंदुरबार जिल्ह्यात पाणी मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे.दुष्काळ परिस्थिती असल्याने गावातील विहरी- नाले आटल्या आहेत. यामध्ये शासना कडे जल जिवन योजने द्वारे प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळ परिस्थिती असल्याने गावातील विहरी- नाले आटल्या आहेत. यासाठी विहीरी अधिग्रहण करुन लोकांपर्यत पाणी पोहचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
नंदुरबार मध्ये 51 गावांपैकी बहुसंख्य गावात कोट्यवधी रुपये खर्चुन सुद्धा राबविली जात असलेली जलजीवन मिशनची पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली नसल्याचे उघड झाले आहेत. नंदुरबारमध्ये ही योजना जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविली गेली आहे. मात्र अद्यापही अनेक गावात पाणीच पोहचले नसल्याचे या आढावा बैठकीतून पुढे आले आहे. सध्या नंदुरबारमधल्या तापी नदीवरील प्रकाशा बॅरेज आणि विरचक धरणात मुबलक पाणीसाठा उपल्बध आहे.
धरणात पाणी असून सुद्धा ते लोकांच्या घरात पोहचत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. या योजनेतील अंदाजपत्रकातील चुकांमुळे सुधारीत अंदाजपत्रकांसाठी अनेक योजना सुमारे दिड वर्षांपासून शासन दरबारी रखडल्या गेल्या आहेत. या योजनांचे अंदाजपत्रक व्यवस्थित आहे, त्यांची देयक रखडल्याने ठेकेदारांकडून काम बंद केले गेले आहे. तर रेल्वे रुळ ओलांडण्याची परवानही, महामार्ग विभागाच्या रस्ता चारी वापराची परवानगी यासाठीही अनेक गांवाच्या सामुहिक योजना ढिसाळ नियोजनामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळेच या योजनेत फक्त ठेकेदारांची खळगी भरण्यासाठी यंत्रणेने काम केल्याचा आरोप अनेकांनी थेट आमदार विजकुमार गावीत यांच्या समोर केला.
Amravati News: दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न! जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पत्रपरिषदेत माहिती
Ans: नंदुरबार जिल्ह्यातील 622 गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
Ans: 100 हून अधिक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.
Ans: विहिरींचे अधिग्रहण, हँडपंप बसवणे, उपलब्ध जलस्रोतांचा वापर आणि जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यावर भर दिला जाणार .






