नाशिकच्या चांदवड शहरात नगरपरिषदेने अचानक वाढवलेल्या पाणीपट्टीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) रस्त्यावर उतरली. अहिल्याबाई होळकर रंगमहालापासून काढलेल्या मोर्च्यानंतर नगरपरिषद कार्यालयासमोर पोहोचून कार्यकर्त्यांनी वाढीव पाणीपट्टी बिलांची होळी करत संतप्त निदर्शने केली. तब्बल तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचलेल्या वाढीव बिलांचा नागरिकांनी तीव्र विरोध केला असून, शहरात अद्याप नियमित पाणीपुरवठा सुरू नसताना नगरपरिषदेने नागरिकांवर अन्याय केला असल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी “नगरपरिषद करायचे काय? – नळपट्टी रद्द करा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.