Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Omraje Nimbalkar: ‘फक्त चर्चेने मी वाईट झालो?’; रीलस्टार टिकेवर ओमराजे निंबाळकर भावुक, ‘ऑपरेशन टायगर’ फेल होणार?

सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला आणि 'रील स्टार' (Reel star) म्हणून केल्या गेलेल्या उल्लेखाला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, "मी ठाकरेंचा आदर करतो."

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 21, 2026 | 02:40 PM
Omraje Nimbalkar: ‘फक्त चर्चेने मी वाईट झालो?’; रीलस्टार टिकेवर ओमराजे निंबाळकर भावुक, ‘ऑपरेशन टायगर’ फेल होणार?
Follow Us
Follow Us:
  • ‘फक्त चर्चेने मी वाईट झालो?’
  • रीलस्टार टिकेवर ओमराजे निंबाळकर भावुक
  • ‘ऑपरेशन टायगर’ फेल होणार?
Omraje Nimbalkar On Operation Tiger: पुण्याहून धाराशिवला रवाना होण्यापूर्वी, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर त्यांच्यावर झालेल्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी ते भावूक झाले होते; केवळ तीन दिवसांच्या तर्कवितर्कांमुळे आपण वाईट माणूस ठरलो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केवळ ‘रील्स’ बनवून निवडणूक जिंकता येत नाही

सोशल मीडियावर आपली ‘रील-स्टार’ (Reel-star) म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांवर ओमराजे निंबाळकर यांनी विशेष टीका केली. केवळ ‘रील्स’ बनवून निवडणूक जिंकता येत नाही, हे टीकाकार विसरले आहेत का, असा प्रश्न त्यांनी विचारला; लोकांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवूनच त्यांना मतदान केले होते. त्यांनी पुढे सांगितले की, जरी त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतला नसला, तरी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे आणि त्यांचा अपमान केला जात आहे ही बाब त्यांना अत्यंत वेदनादायी वाटत आहे.

वडिलांची हत्या आणि न्यायासाठीचा लढा

आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना ओमराजे म्हणाले की, त्यांच्या वडिलांची हत्या हे एक राजकीय कारस्थान होते आणि त्याच दिवशी त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ३ जून २००६ रोजी त्यांच्या कुटुंबाने जी वेदना सहन केली होती, तशीच वेदना आज आपल्याला होत असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालयाच्या अलीकडील निकालाचा संदर्भ देत, त्यांनी न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली; कारण त्यांच्या कुटुंबाला अपेक्षित असलेला न्याय अद्याप मिळालेला नाही.

‘माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

‘मशाल’ चिन्ह आणि पराभवाचे विश्लेषण

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांबाबतही चिंता व्यक्त केली. आपल्या लोकसभा मतदारसंघातील एकही पंचायत समिती किंवा नगरपालिका ‘मशाल’ चिन्हावर का जिंकता आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “कैलास पाटील, आमचे इतर सहकारी आणि मी जनतेसाठी अहोरात्र काम करतो. आमचे कार्यकर्ते गुन्हेगार किंवा अमली पदार्थांचे व्यापारी नाहीत; मग आम्हाला पराभवाचा सामना का करावा लागला? याचे कारण मला शोधायचे आहे.”

भविष्याबाबतचा निर्णय

ठाकरे कुटुंबाबद्दल आदर व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट केले की, ते त्यांच्या विरोधात कधीही बोलणार नाहीत. धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथे आपण आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच एखादा मोठा निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही ओमराजे यांच्याबाबत बरीच आशावादी असल्याचे दिसून येत आहे.

‘इतरांवर भोंगा वाजवणाऱ्या राऊतांचा भोंगा वर्धापनदिनाच्या मंचावरच म्यूट,’ भाजपची संजय राऊत यांच्यावर जोरदार आगपाखड

Web Title: Omraje nimbalkar emotional statement on reel star criticism will operation tiger fail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Mp Omraje Nimbalkar
  • shivsena
  • UBT
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
2

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
3

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…
4

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.