Navi Mumbai : पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास स्थगित
नवी मुंबई महानगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कंत्राट प्रकरणावरुन मोठा वाद सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्यांच्या संपास तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. किमान वेतन कायद्यांतर्गत वेतन नियमित करण्यावरून कंत्राटी कर्मचारी आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यात सुरू असलेला वाद आणखी तीव्र झाला होता. कर्मचारी संघटनेने अनिश्चित काळासाठी संप पुकारला होता, नवी मुंबई महानगरपालिकेत विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या 8,050कामगारांनी आजपासून (10 फेब्रुवारी) कामबंद आंदोलन पुकारलंय होत अखेर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे.. ‘समान काम, समान वेतन’ या मागणीसाठी हे आंदोलन पुकारल होतं.