Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Airport ची दुर्दशा? विमानसेवा सुरु अन् नेटवर्क ठप्प, प्रवाशांची गैरसोय

नवी मुंबई विमानतळ मोठ्या दणक्यात सुरु झाले. मात्र, येथे मोबईल नेटवर्क नसल्याने अनेक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 31, 2025 | 09:58 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई विमानतळावरील मोबाईल नेटवर्क ठप्प
  • प्रवाशांची मोठी गैरसोय
  • विमानतळावर दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी कंपन्यांचा अव्वाच्या सव्वा दर
नवी मुंबई विमानतळावरील विमानसेवा सुरु झाली. या नवीन विमानतळाला प्रवाशांनी देखील मनभरून प्रतिसाद दिला आहे. मात्र, इतके मोठे विमानतळ असून देखील येथील प्रवाशांना मोबईल नेटवर्क मिळत नाही आहे. परिणामी, प्रवाशांची मोठी गैरसोय पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच प्रवासी वाहतूक सुरू झाली असली, तरी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जरी विमानतळ प्रशासनाने वाय-फाय सुविधा उपलब्ध दिली असली, तरी दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी कंपन्यांकडून अतिशय जास्त शुल्क आकारले जात असल्याचा आरोप होत आहे. शिवाय, तोपर्यंत परिसरात स्वतंत्र जाळे उभारण्यास परवानगीही नाकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दूरसंचार कंपन्यांच्या संघटनेने दूरसंचार मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे.

‘या’ राज्यातील EV खरेदीदारांची बल्ले बल्ले! रोड टॅक्समधून मिळणार 100 टक्क्यांची सूट, रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा एकही पैसे लागणार

नवी मुंबई विमानतळ हे सार्वजनिक ठिकाण असल्याने, येथे दूरसंचार पायाभूत सुविधा उभारण्यास परवानगी देणे दूरसंचार कायद्यानुसार बंधनकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिलायन्स इन्फोकॉम, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्या विमानतळावर सेवा देण्यास इच्छुक आहेत. मात्र, विमानतळ प्रशासनाकडे दूरसंचार जाळे उभारण्याची परवानगी मागितल्यानंतर ती नाकारण्यात आल्याचा आरोप सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाने केला आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, कंपन्यांना स्वतंत्र जाळे उभारण्याऐवजी विमानतळ प्रशासनाचेच नेटवर्क वापरण्याची अट घालण्यात आली असून, त्यासाठी प्रत्येक कंपनीकडून दरमहा ९२ लाख रुपये भाडे मागितले जात आहे. हे शुल्क अत्यंत अवाजवी असून, प्रत्यक्ष दूरसंचार जाळे उभारण्याच्या खर्चापेक्षा आणि नियमांमध्ये नमूद शुल्कापेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Renault ची Electric Car म्हणजे फक्त रफ्तारsss! सिंगल चार्जवर पार केले 1,008 किमीचे अंतर

दरम्यान, विमानतळ प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. विमानतळ हे संवेदनशील क्षेत्र असल्याने दूरसंचार सेवेची देखभाल अत्यंत महत्त्वाची असून, ती विमानतळ प्रशासनामार्फतच अधिक सुरक्षित आणि प्रभावीपणे करता येते, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दूरसंचार कंपन्यांकडून आकारलेले शुल्क उद्योगातील मानकांनुसारच असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात कंपन्यांशी चर्चा करूनच विमानतळावर आयबीएस सेवा उभारण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच, बीएसएनएल लवकरच या सेवेची चाचणी करणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Navi mumbai international airport network services down know reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • Marathi News
  • Navi Mumbai
  • navi Mumbai Airport

संबंधित बातम्या

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज
2

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी
3

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

पारावरच्या आणि चावडीवरच्या गोष्टींना एवढे महत्त्व का? छगन भुजबळ यांचे वक्यव्य
4

पारावरच्या आणि चावडीवरच्या गोष्टींना एवढे महत्त्व का? छगन भुजबळ यांचे वक्यव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.