नेरळच्या कुंभारवाड्यात गेल्या ७५ वर्षांपासून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा जपली जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत या पारंपरिक कलेला नवी पिढीही हातभार लावत असून, विद्यार्थिनींनी मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन दिले जात असताना, नेरळच्या कुंभारवाड्यात गेल्या ७५ वर्षांपासून शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा जपली जात आहे. दहिवलीकर कुटुंबाच्या सिद्धेश गणेश कला केंद्रात आजही शाडूच्या मातीपासून विविध आकारांच्या गणेशमूर्ती घडवल्या जातात.
मात्र ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान असताना, गणेशमूर्ती बनवण्याची आवड असलेल्या मुली आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनी मदतीसाठी पुढे आल्या आहेत. अलिबाग, कामोठे-नवी मुंबई आणि अंबाडी-भिवंडी परिसरातील विद्यार्थिनी आपल्या फावल्या वेळेत मूर्तींची रंगरंगोटी, पॉलिश, नक्षीकाम तसेच मातीत हात घालून मूर्ती घडवण्याचे काम करत आहेत.
नेरळच्या या कारखान्यात एक ते पाच फुटांपर्यंतच्या शाडूच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. पर्यावरणपूरक मूर्ती आणि आकर्षक कलाकुसरीमुळे या मूर्तींना कर्जत, पनवेल, ठाणे आणि मुंबई परिसरातील गणेशभक्तांकडून चांगली मागणी मिळत आहे.