Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Kunafa Modak Recipe : कुनाफा चाॅकलेट तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण कुनाफ मोदक? या पदार्थाचा कधी तुम्ही विचारही केला नसावा पण गणेशोत्सवाच्या या सणानिमित्त ही रेसिपी एकदा नक्की करुन पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 12:55 PM
Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल 'कुनाफा मोदक', रेसिपी करा नोट

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल 'कुनाफा मोदक', रेसिपी करा नोट

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवाचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
  • मोदक ही गणपतीच्या आवडीची डिश आहे.
  • यंदा तुम्ही ट्रेंडी आणि फ्यूजन मोदकाची रेसिपी ट्राय करु शकता.
गणेशोत्सवात दरवर्षी उकडीचे मोदक, तळलेले मोदक किंवा नारळ-साखरेचे मोदक बनवले जातात. मात्र यंदा पारंपरिक चवीसोबत काहीतरी नवीन आणि आधुनिक करून पाहायचे असेल, तर दुबई स्टाईल कुनाफा मोदक नक्कीच करून पाहता येईल. दुबई चॉकलेटपासून प्रेरित असलेल्या या मोदकामध्ये कुरकुरीत कुनाफा, पिस्ता आणि चॉकलेट यांचे अप्रतिम मिश्रण केले जाते. गणपतीच्या नैवेद्यासाठी काहीतरी हटके बनवायचे असेल किंवा पाहुण्यांना नवीन प्रकारची मिठाई खाऊ घालायची असेल, तर ही रेसिपी उत्तम पर्याय ठरू शकते. चला तर मग पाहूया हा स्वादिष्ट कुनाफा मोदक घरच्या घरी कसे तयार करायचे याची रेसिपी नोट करुन घेऊयात.

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

साहित्य

कुनाफा थरासाठी

  • 2 कप बारीक चिरलेला कुनाफा
  • 2 चमचे बटर
  • 100 ग्रॅम मिल्क किंवा डार्क चॉकलेट
पिस्ता फिलिंगसाठी
  • ½ कप पिस्ता पेस्ट
  • 2 चमचे मिल्क पावडर
  • 1 ते 2 चमचे कंडेन्स्ड मिल्क
  • 2 चमचे बारीक चिरलेला पिस्ता
मोदक सजावटीसाठी
  • वितळलेले चॉकलेट
  • बारीक चिरलेला पिस्ता
  • थोडे ड्राय रोझ पेटल्स, ऐच्छिक
Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

कृती

  • सर्वप्रथम कुनाफा बारीक चिरून घ्या. कढईत बटर गरम करून त्यात कुनाफा घाला. मंद आचेवर सतत हलवत तो सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गॅस बंद करून तो पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • चॉकलेट वितळवून घ्या. भाजलेल्या कुनाफ्यामध्ये वितळलेले चॉकलेट घालून व्यवस्थित मिसळा. मिश्रणात चॉकलेटचा प्रत्येक भाग हलका कोट होईल याची काळजी घ्या.
  • एका भांड्यात पिस्ता पेस्ट, मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क आणि चिरलेला पिस्ता घाला. सर्व साहित्य एकत्र करून घट्ट आणि क्रीमी मिश्रण तयार करा. मिश्रण खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
  • मोदकाच्या साच्याला आतून हलका बटर किंवा तेलाचा हात लावा. त्यानंतर चॉकलेट-कुनाफ्याचे मिश्रण साच्यात भरून त्याच्या बाजूला आणि तळाशी व्यवस्थित दाबून एक थर तयार करा. मधोमध पिस्त्याचे फिलिंग भरा.
  • पिस्त्याच्या फिलिंगवर पुन्हा चॉकलेट-कुनाफ्याचे मिश्रण घालून ते घट्ट दाबा. फिलिंग बाहेर येणार नाही आणि मोदक व्यवस्थित बंद होईल याची काळजी घ्या.
  • साचा बंद करून तयार मोदक फ्रिजमध्ये साधारण 20 ते 30 मिनिटे ठेवा. मोदक सेट झाल्यानंतर सावधपणे साचा उघडा आणि मोदक बाहेर काढा.
  • तयार मोदकावर थोडे वितळलेले चॉकलेट, बारीक चिरलेला पिस्ता किंवा ड्राय रोझ पेटल्स घालून सजवा.
  • चॉकलेट पूर्णपणे सेट झाल्यावर हा कुरकुरीत आणि क्रीमी कुनाफा मोदक नैवेद्यासाठी किंवा डेझर्ट म्हणून सर्व्ह करा.

Web Title: Ganeshotsav 2026 make trendy kunafa modak at home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • ganesh special modak
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.