Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवाच्या काळात गौरी आगमन, ऋषीपंचमी यांसारखे महत्त्वाचे धार्मिक दिवसही येतात. त्यामुळे घरगुती गणपतीपासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत भक्तांसाठी सप्टेंबर महिना उत्साहाचा ठरणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 01, 2026 | 07:02 PM
Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थी
  • २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जन
  • गणेशोत्सवासाठी भक्तांची आतापासूनच तयारी सुरू
सध्या सगळ्यांच्याच तोंडात एकच प्रश्न आहे, गणपती बाप्पा कधी येणार? सगळ्या गणेश भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात हा सण दिवाळीपेक्षा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक आतापासूनच तयारीला लागले आहेत. बाप्पाला वाजत गाजत घरी आणणे, त्याची स्थापना करणे, १० दिवस सेवा करणे आणि मग जड अंतःकरणाने निरोप देणे, हा सगळा सोहळा अवर्णनीय असतो.

यंदा गणेशोत्सव कधी आहे? आणि ऋषीपंचमी, गौरी आगमन, अनंत चतुर्दशी कधी आहे? याची सगळी माहिती आपण आज सोप्या भाषेत बघूया.यंदा गणेश चतुर्थी कधी आहे?पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीला येते आणि अनंत चतुर्दशीला संपते. यंदा २०२६ मध्ये गणेश चतुर्थी १४ सप्टेंबरला आहे.Ganesh Chaturthi 2026:

चतुर्थी नेमका वेळ किती वाजताचा?

चतुर्थी तिथी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ सप्टेंबरला सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी संपेल. पण उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी १४ तारखेलाच धरली जाणार आहे.पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?बाप्पाची स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त बघणं खूप गरजेचं असतं. यंदा पूजेचा मुहूर्त सकाळी ११ वाजून २ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आहे. जवळपास अडीच तासांचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. या वेळेतच बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. या दिवशी चंद्र पाहू नये अशी मान्यता आहे.

चंद्र दिसण्याची वेळ

चंद्र दिसण्याची वेळ रात्री ८ वाजून ४४ मिनिटे आहे, त्यामुळे त्यावेळी चंद्राकडे पाहणे टाळा.गणेशोत्सवातील इतर महत्त्वाचे दिवसगणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत १०-११ दिवस खूप धामधूम असते. सप्टेंबर महिना यंदा सणांचाच असणार आहे.१५ सप्टेंबर, मंगळवार – ऋषीपंचमी

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी ऋषीपंचमी आहे. भाद्रपद शुद्ध पंचमीला हा सण येतो. महिला या दिवशी सप्तर्षींची पूजा करतात आणि उपवास करतात. याच दिवशी शेगावचे गजानन महाराज यांची पुण्यतिथी पण आहे.१७ सप्टेंबर, गुरुवार – ज्येष्ठा गौरी आगमन

गणपतीसोबतच गौरींचं पण तितकंच महत्त्व का?

महाराष्ट्रात गणपतीसोबतच गौरींचं पण तितकंच महत्त्व आहे. १७ तारखेला संध्याकाळी गौरींचं आगमन होईल. संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत आवाहन करता येईल. बऱ्याच घरात या दिवशी माहेरवाशिणी म्हणजे गौरी घरी येते असं मानतात.१८ सप्टेंबर, शुक्रवार – ज्येष्ठा गौरी पूजन

दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आहे. गौरीला पार्वती मातेचं आणि महालक्ष्मीचं रूप मानतात. गणपतीची आई घरी आली म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. महिला या दिवशी नवीन साडी, दागिने घालून गौरीची पूजा करतात, नैवेद्य दाखवतात.१९ सप्टेंबर, शनिवार – गौरी विसर्जन

तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन होईल. याच दिवशी दुर्गाष्टमी पण आहे.२५ सप्टेंबर, शुक्रवार – अनंत चतुर्दशी

सगळे बाप्पाला निरोप

हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. या दिवशी आपण सगळे बाप्पाला निरोप देतो. सकाळी पूजा, आरती करून मिरवणुकीने बाप्पाला विसर्जनासाठी नेलं जातं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत डोळ्यात पाणी आणून निरोप दिला जातो.तर मित्रांनो, या तारखा लक्षात ठेवून आतापासूनच तयारीला लागा. बाप्पाच्या स्वागतासाठी सगळं घर सजवायचं आहे.

Web Title: When is ganpati festival check ganesh chaturthi gauri and anant chaturdashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati Festival
  • navrashtra news
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2026: घटस्थापनेची रोपं हिरवीगार की खुंटलेली? धार्मिक महत्त्व, शुभ संकेत आणि विसर्जनाची परंपरा जाणून घ्या!
1

Shardiya Navratri 2026: घटस्थापनेची रोपं हिरवीगार की खुंटलेली? धार्मिक महत्त्व, शुभ संकेत आणि विसर्जनाची परंपरा जाणून घ्या!

म्हसोबाचं देऊळ शेतातल्या बांधावरच का असतं? नेमका कोण आहे हा गावाकडचा म्हसोबा देव? जाणून घ्या
2

म्हसोबाचं देऊळ शेतातल्या बांधावरच का असतं? नेमका कोण आहे हा गावाकडचा म्हसोबा देव? जाणून घ्या

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा
3

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा
4

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.