कामोठे वसाहतीतील नागरिकांमध्ये सध्याच्या लोकप्रतिनिधींविरोधात नाराजीचा सूर स्पष्टपणे दिसून येत आहे. वसाहतीतील मूलभूत समस्या—रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सुविधांबाबत समाधानकारक काम न झाल्याची भावना मतदारांमध्ये आहे. त्यामुळे मतदारांना आता बदल हवा असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट होत आहे. पनवेल येथे मतदारांचा जाहीरनामा या उपक्रमाअंतर्गत कामोठे वसाहतीतील मतदारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी माजी नगरसेवकांनी केलेल्या कामावर असमाधान व्यक्त करत नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यांवर ठोस आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचे मत मांडले. बदलाच्या अपेक्षेने कामोठेतील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.