ऐन महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच माजी नगरसेविका आशा तडवी यांनीही काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास पक्षाकडून मुभा दिली जात नसल्याने नाराजी असल्याचे राजीनाम्याचे प्रमुख कारण असल्याचे समजते. महापालिका निवडणुकांसाठी मनसेसह इतर पक्षांसोबत आघाडी करण्याची इच्छा होती, मात्र पक्षाने यास परवानगी नाकारली.आघाडी झाली नाही तर निवडणुकीत नुकसान होईल, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींसमोर मांडण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.