ठाकरे बंधू एकत्र येण्याचा कोणताही परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीत होणार नाही असं जालन्यातील माजी आमदार आणि भाजपचे जालन्यातील नेते कैलास गोरंटयाल यांनी म्हटलं आहे.तसेच मुंबई महापालिकेवर युतीचाच भगवा फडकेल असा दावाही गोरंटयाल यांनी केलाय.दरम्यान गोरंटयाल यांनी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचा चांगलाच समाचार घेतलाय.भाजपने दोन दिवसांत युतीबाबतचा निर्णय कळवावा अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा अलटीमेटम खोतकर यांनी काल भाजपला दिला होता.यावरून गोरंटयाल यांनी खोतकरांना खडसावलंय.मि भाजपचा निवडणूक प्रमुख आहे.माझ्याकडे शिवसेनेकडून कोणताही युतीचा प्रस्ताव आलेला नाही.त्यामुळे खोतकरांनी अलटीमेटमच्या गोष्टी करू नये. असा ईशारा गोरंटयाल यांनी खोतकरांना दिलाय.#खोतकर आमच्यासोबत युतीची भाषा करतात आणि दुसरीकडे आमच्याच कार्यकर्त्यांना मोक्का लावण्याची भाषा करतात असंही गोरंटयाल म्हणालेत.