फोटो सौजन्य: Instagram
महिंद्रा लवकरच मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये आपली नवी SUV Mahindra XUV 7XO लाँच करण्याच्या तयारीत आहे. लाँचपूर्वी या SUV चा आणखी एक नवीन टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यामधून अनेक आकर्षक फीचर्सची माहिती समोर आली आहे. या SUV मध्ये कोणते फीचर्स देण्यात येणार आहेत,त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता
Mahindra कडून लवकरच Mahindra XUV 7XO ही नवी SUV बाजारात दाखल केली जाणार आहे. लॉन्चपूर्वी कंपनीने सोशल मीडियावर या SUV चा नवीन टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये SUV मधील अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स दाखवण्यात आले असून, त्यामुळे ही SUV ग्राहकांसाठी एक दमदार पर्याय ठरणार आहे.
Mahindra ने जारी केलेल्या नवीन टीझरमधून SUV मधील अनेक फीचर्सची अधिकृत पुष्टी झाली आहे. यामध्ये Level-2 ADAS, Lane Departure System, 540 डिग्री कॅमेरा, सनरूफ, रियर सीटसाठी स्क्रीन, अडरेनॉक्स सिस्टिम तसेच फ्रंटमध्ये Triple Screen setup यांसारखे अत्याधुनिक फीचर्स देण्यात येणार असल्याचे दिसून आले आहे.
याआधीही या SUV चा एक टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्या टीझरमध्ये Triple Screen व्यतिरिक्त SUV मध्ये Boss Mode देण्यात येणार असल्याची पुष्टी करण्यात आली होती.
विदेशात Made In India SUVs ठरल्या ब्लॉकबस्टर! ‘या’ ऑटो कंपनीचा मार्केट शेअर 47 टक्क्यांपेक्षा जास्त
लवकरच लाँच होणाऱ्या Mahindra XUV 7XO साठी प्री-बुकिंगही सुरू करण्यात आली आहे. ग्राहक 21 हजार रुपये भरून ही SUV ऑनलाइन किंवा अधिकृत डीलरशिपद्वारे बुक करू शकतात.
Mahindra XUV 7XO मध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनचे पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिन मिळू शकते. यासोबतच 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्यायही देण्यात येण्याची शक्यता आहे.
Mahindra कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही SUV भारतात अधिकृतपणे 5 January 2026 रोजी लाँच केली जाणार आहे.






