सातारा शहरापासून कास पठारापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे परंतू कास पठारापासून कास तलावाकडे जाणार १ किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य झालेले आहे. कास पठार परिसराच्या विकासासाठी २ वर्षांपूर्वी कोट्यवधी निधी मंजूर करण्यात आला होता. परंतू कास पठार पासून कास तलाव परिसरात जाणारा विकासापासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळे कास तलाव पाहण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांना याच्या फटका बसत आहे. कास पठार पाहण्यासाठी आलेले पर्यटक कास तलाव पाहण्यासाठी त्या रस्त्याने जात असतात परंतू रस्ता खराब असल्यामुळे पर्यटक तलावाकडे जात नाही त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.