Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धरण उशाला, तरी वाईचा शेतकरी तहानलेला; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

दिवाळीचा सण उंबरठ्यावर असतानाही अनेक शेतकऱ्यांच्या घरात सणाचा आनंद नव्हे, तर चिंतेचे सावट आहे. एकीकडे धरणात पाणी दिसते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके करपताना दिसत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 25, 2026 | 03:00 PM
धरण उशाला, तरी वाईचा शेतकरी तहानलेला; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

धरण उशाला, तरी वाईचा शेतकरी तहानलेला; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

Follow Us
Follow Us:
  • निसर्गाच्या अवकृपेमुळे वाई तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात 
  • पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान 
  • भात, घेवडा, सोयाबीन, हायब्रीड सूर्यफूल आणि तीळ पिके करपली
वाई : वाई तालुक्यासह परिसरातील शेतकरी यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे अक्षरश मेटाकुटीला आला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील भात, घेवडा, सोयाबीन, हायब्रीड सूर्यफूल, तीळ यांसह अनेक पिके हातातोंडाशी आलेली असतानाच करपून गेली आहेत. पूर्व भागातील अनेक गावांमध्ये भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उभ्या पिकांकडे हताशपणे पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

आता दिवाळीचा सण उंबरठ्यावर असतानाही अनेक शेतकऱ्यांच्या घरात सणाचा आनंद नव्हे, तर चिंतेचे सावट आहे एकीकडे धरणात पाणी दिसते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके करपताना दिसत आहेत. त्यामुळे ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी विदारक परिस्थिती वाई तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात निर्माण झाली आहे. पूर्व भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थितीही गंभीर झाली आहे. ऊस व रब्बी पिकासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची उपलब्धता आणि कालव्याद्वारे होणारे पाणीवाटप याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Solapur District Bank : ‘रणजितदादा बाहेर पडा, भाकरी फिरवा’; मोहिते-पाटील गटाच्या नेते, कार्यकर्त्यांची शिवरत्न बंगल्यावर बैठक

पिके जगविण्यासाठी पाण्याची नितांत गरज असताना उपलब्ध जलसाठ्याचा शेतीसाठी अपेक्षित उपयोग होत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये तीव्र आहे. दुष्काळ जाहीर झाला, आता मदत कधी राज्य शासनाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी खरीप हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि दुष्काळाच्या विविध निकषांचा आढावा घेत Trigger-1 आणि Trigger-2 लागू झालेल्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार पर्जन्यमानातील तूट, कोरडा कालावधी तसेच शेतीवरील प्रत्यक्ष परिणाम यांचा विचार दुष्काळाच्या मूल्यांकनात केला जातो.

Trigger-2 मध्ये पावसाच्या कमतरतेचा प्रत्यक्ष शेतीवर झालेला परिणाम महत्त्वाचा ठरतो दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी शासनाने जमीन महसुलात सवलत, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलासंदर्भातील सवलती तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत अशा विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र, पीक नुकसानीची प्रत्यक्ष आर्थिक मदत स्वतंत्र शासन निर्णयाने निश्चित होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पंचनामे झाले; आता कागदपत्रांच्या जंजाळातून शेतकऱ्यांची सुटका करा

शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागाच्या पथकांकडून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी आणि पंचनामे सुरू आहेत. वाई तालुक्यातही प्रशासनाने शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून, एकही नुकसानग्रस्त खातेदार पंचनाम्यापासून वंचित राहू नये, असे निर्देश उपविभागीय कार्यालयाकडून डॉ योगेश खरमाटे यांच्याकडून देण्यात आले आहेत. मात्र, पंचनामे करण्यापासून पुढे प्रत्यक्ष मदत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होईपर्यंतची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेगवान करण्याची गरज आहे.

FAQ

1. वाई तालुक्यात शेतकरी संकटात का सापडला आहे?
पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

2. वाई तालुक्यात कोणत्या पिकांचे नुकसान झाले आहे?
भात, घेवडा, सोयाबीन, हायब्रीड सूर्यफूल आणि तीळ यांसह अनेक खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

3. भातशेतीचे नुकसान कुठे झाले आहे?
वाई तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Web Title: Tears in eyes of farmers on eve of diwali due to lack of water nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Farmer Crisis
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

मनसेच्या दणक्यानंतर FDA मैदानात; साताऱ्यात लाखोंचा माल जप्त, तीन आस्थापनांचे परवाने निलंबित, भेसळखोरांविरुद्ध आंदोलनाचा इशारा
1

मनसेच्या दणक्यानंतर FDA मैदानात; साताऱ्यात लाखोंचा माल जप्त, तीन आस्थापनांचे परवाने निलंबित, भेसळखोरांविरुद्ध आंदोलनाचा इशारा

Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?
2

Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?

Satara News : सातारा पालिकेच्या वसुलीचे मोठे आव्हान; ३०.५८ कोटींची तूट भरून काढण्यासाठी धावपळ!
3

Satara News : सातारा पालिकेच्या वसुलीचे मोठे आव्हान; ३०.५८ कोटींची तूट भरून काढण्यासाठी धावपळ!

Dhule March :  धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक मोर्चा, फक्त 5 हजार रुपयाची मदत, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम
4

Dhule March : धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक मोर्चा, फक्त 5 हजार रुपयाची मदत, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.