Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : इथे ओशाळली माणूसकी, प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्… ; अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना

मोखाडा तालुक्यात एका गरोदर स्त्रीला प्रसुत झालेल्या महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने चक्क अर्ध्या रस्त्यात सोडून दिले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 24, 2025 | 08:01 PM
Palghar News : इथे ओशाळली माणूसकी, प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्… ; अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना
Follow Us
Close
Follow Us:
  • प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्…
  • प्रसूत महिलेची अनवाणी पायपीट
  • मोखाडा तालुक्यातील दुर्दैवी घटना
मोखाडा/ दिपक गायकवाड: पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि सभोवतालचा परिसर हा अतिदुर्गम भागात येतो. या आदिवासी पाड्यात रोगच्या जगण्यासाठी देखील लोकांना संघर्ष करावा लागतो. अद्याप मागासलेल्या या भागात आरोग्य सुविधा देखील क्वचितच मिळते. अशा परिस्थितीत खास करुन गरोदर महिलांचे हाल होतानाच्या समस्या प्रकर्षाने समोर आली आहे.

मोखाडा तालुक्यात एका गरोदर स्त्रीला प्रसुत झालेल्या महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने चक्क अर्ध्या रस्त्यात सोडून दिले. तालुक्यातील अति दुर्गम अशा आमले गावातील प्रसूत महिला सविता बांबरे हिला जव्हारहून घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेने आमले घाटात अर्ध्यावरच सोडले. या ओल्या बाळंतीणला तब्बल दोन किलोमीटर बाळाला छातीशी कवटाळत डोंगर उताराची वाट अनवाणी तुडवण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. आरोग्य व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे नाहक त्रास गावरकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्या प्रकरणाविरोधात सर्व स्थरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Palghar News: मोखाड्यात आयशर ट्रकचा भीषण अपघात! मजुरीसाठी गेलेल्या एकाच मृत्यू 40 हून अधिक जखमी

काळीज पिळवटून टाकणारी घटना अशी की, श्रीमती सविता बांबरे या महिलेला प्रसूतीसाठी 19 नोव्हेंबर रोजी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची येथे सुलभ प्रसूती शक्य नसल्याने तिला पुढे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवा देण्यात आली होती. इथे तीची प्रसूती सुलभतेने झाली मात्र बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जव्हार येथील कॉटेज हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. येथे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करून बाळ आणि बाळंतीनिला कॉटेज हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने त्यांच्याकडील रुग्णवाहीका उपलब्ध करून देऊन तिला सुखरूप पणे घरी सोडण्याची तजवीज केली.

मात्र रुग्णवाहीका चालकाने प्रथम आडमुठेपणा करत सूर्यमाळ घाटात बाळबाळंतनीला हटवादीपणे अर्ध्यावरच सोडले. यावेळी सविताने व तिच्या पतीने हातापाया पडून विनंती केल्या. नंतर या चालकाने त्यांना पुढे आमला फाटा येथे गावापासून दोन किलोमीटर मागेच सोडून दिले आणि रुग्णवाहीका घेऊन चालक बेजबाबदाऱपने जव्हार येथे निघून गेला आहे. त्यामुळे सविता हिला आपले बाळ छातीशी कवटाळून डोंगर उताराची वाट अनवाणी तुडवीत जावी लागली आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने स्थानिक आरोग्य प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले.

वारंवार विनंती करूनही आमच्या बाळबाळंतनीला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडले आहे. त्यामुळे आम्हाला तिथून पुढे दोन किलोमीटर चालत जाऊन घर गाठावे लागले आहे. यादरम्यान सविताला काही अपघात झाला असता तर आम्ही आणि या नवजात लेकराने कोणाच्या तोंडाकडे पाहिले असते? असा सवाल करत सविताच्या पतीने आरोग्य प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी मागणी देखील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

वारघडपाडा येथे एआय आधारित लेपर्ड डिटेक्शन प्रणाली! बिबट्या दिसताच वाजणार सायरन

Web Title: Palghar news humanity has been lost here a pregnant woman was left half dead by an ambulance a heartbreaking incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 08:01 PM

Topics:  

  • Health News
  • Marathi News
  • palghar

संबंधित बातम्या

Karjat News : भिवपुरी कारशेडच्या कामात २२ कोटी बुडवल्याचा आरोप; किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार
1

Karjat News : भिवपुरी कारशेडच्या कामात २२ कोटी बुडवल्याचा आरोप; किरण ठाकरे यांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार

आता प्रत्येक जल्लोषात येणार रंगत! ‘रुबाब’ चित्रपटातील धमाकेदार ‘पॉम पॉम’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
2

आता प्रत्येक जल्लोषात येणार रंगत! ‘रुबाब’ चित्रपटातील धमाकेदार ‘पॉम पॉम’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

दीपाली सय्यदने टाकली ठिणगी… राधा पाटीलला म्हणाली Bar Dancer? लोककला लावणीबद्दल दाखवला जिव्हाळा
3

दीपाली सय्यदने टाकली ठिणगी… राधा पाटीलला म्हणाली Bar Dancer? लोककला लावणीबद्दल दाखवला जिव्हाळा

‘हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील…’, भारतात “संभावामि युगे युगे” चा पहिला शो दणक्यात पडला पार!
4

‘हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील…’, भारतात “संभावामि युगे युगे” चा पहिला शो दणक्यात पडला पार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.