
कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप
मुखई हे शिरूर तालुक्यातील गाव असून, येथील नागरिकांना शिरूर येथे कागदपत्र पडताळणी करणे अधिक सोयीचे आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नवमतदार असताना गावातच पडताळणी कॅम्प घेण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा या नोटिसांना आपला थेट आक्षेप व हरकत असल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले. याबाबत सरपंच रमेश पलांडे, माजी सरपंच अतुल धुमाळ, संयोगिता पलांडे आणि सचिन पलांडे यांनी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
सोयीच्या ठिकाणी कॅम्प घेण्याबाबत सूचना करू
नवमतदार किंवा सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, अशीच प्रशासनाची भूमिका असते. मुखई ग्रामस्थांच्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांची कागदपत्र पडताळणी शक्यतो सोयीच्या ठिकाणी कशी करता येईल, याबाबत तहसीलदारांना योग्य त्या सूचना करण्यात येतील. त्यानुसार ते उचित निर्णय घेतील, असे प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी सांगितले.
मुखईतच कॅम्प घेण्याची चाचपणी
मुखई गावातील २२८ नवमतदारांना त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शक्यतो मुखई गावातच कागदपत्र पडताळणीचा कॅम्प घेता येईल का, याची चाचपणी यंत्रणेमार्फत करण्यात येत असल्याचे आंबेगावचे तहसीलदार राहुल सारंग यांनी सांगितले.
योग्य निर्णय घेऊ : नायब तहसीलदार
मुखई ग्रामस्थांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचल्या आहेत. याबाबत प्रांताधिकारी अर्चना तांबे आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. कोणालाही त्रास देण्याची प्रशासनाची भूमिका नाही. मतदार नोंदणी प्रक्रियेचा भाग म्हणून कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असून, या प्रकरणातही योग्य भूमिका घेऊन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आंबेगावचे नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी सांगितले.
Ans: मुखई गावातील नव्याने मतदार नोंदणी केलेल्या २२८ ग्रामस्थांना कागदपत्र पडताळणीसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत.
Ans: नवमतदारांना शिरूर तालुक्याऐवजी सुमारे ७० किलोमीटर दूर असलेल्या घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते.
Ans: २२८ नवमतदारांना दूरच्या घोडेगाव येथे जाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी मुखई गावातच कागदपत्र पडताळणीचा कॅम्प आयोजित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे केली आहे.