Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rain Update: बारामतीसह इंदापूरच्या बहुतांश भागात पावसाने झोडपले, द्राक्ष-डाळिंब बागांवर संकटाचे सावट

Rain Update: बारामतीसह इंदापूरला पावसाने झोडपले आहे. बळीराजाला दिलासा मिळाला असला तरीही द्राक्ष आणि डाळिंबांच्या बागांवर मात्र संकटाचे सावट असल्याचे दिसून आले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 02, 2026 | 10:48 AM
पुण्यात बारामती-इंदापूरला पावसाने झोडपले

पुण्यात बारामती-इंदापूरला पावसाने झोडपले

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील बारामती आणि इंदापूर भागाला पावसाने झोडपले
  • बारामतीत सकाळपर्यंत १५८ मि.मी. पावसाची नोंद; १७० मि.मी.चा टप्पा ओलांडल्याची शक्यता
  • सखल भाग जलमय झाला असून, द्राक्ष-डाळिंब बागांवर संकटाचे सावट
Rain Update: बारामती शहरासह जिरायती पट्ट्यात आणि इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. बारामती शहरात सकाळी सात पर्यंत १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही सकाळी सव्वादहापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने एकूण पावसाची नोंद १७० मिलिमीटरच्या पुढे गेली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते आणि सखल भाग जलमय झाले, तर अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, द्राक्ष आणि डाळिंब बागांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

पहाटेपासून पाऊस 

बारामती शहरात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच पावसाचा जोर प्रचंड असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. सखल भागांतून पाणी वाहू लागल्याने काही ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला. गेल्या अनेक दिवसांनंतर बारामतीकरांना ढगफुटीसदृश पावसाचा अनुभव आला.

बारामती शहराबरोबरच माळेगाव, काटेवाडी, पिंपळी-लिमटेक, सोनगाव या भागांतही दमदार पाऊस झाला. जिरायती पट्ट्यातील मोरगाव, जळगाव क.प. तसेच इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर, लासुर्णे आणि परिसरातील गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.

दीडशे वर्षांत तब्बल 111 वर्षे ‘नॉर्मल’ पावसाची; पर्जन्यमानाच्या 155 वर्षांत 27 वर्षे कोरडी राहिली

पाणीटंचाईच्या सावटात मोठा दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बारामती परिसरात पाणीटंचाईचे संकट गडद झाले होते. जिरायती भागातील परिस्थिती गंभीर बनली होती, तर बागायती पट्ट्यातही पाण्याची समस्या जाणवू लागली होती. अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाली होती. परतीच्या पावसाच्या अपेक्षेने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. मात्र, हस्त नक्षत्राच्या कालावधीतही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती.

त्यातच काही दिवसांपूर्वी नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबतही आशा निर्माण केल्या आहेत.

ऊस आणि चारा पिकांना संजीवनी; फळबागांची चिंता वाढली

बारामती आणि इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांसह चारा पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी अडचणीत आलेल्या पिकांना या पावसाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, मुसळधार पावसाचा द्राक्ष आणि डाळिंब बागांना फटका बसण्याची शक्यता असल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

पावसाचा जोर आणि त्यानंतरची हवामानस्थिती यावर पिकांचे नुकसान किती होणार, हे अवलंबून राहणार आहे. एकीकडे पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या शेतीला या पावसाने नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण केली आहे, तर दुसरीकडे परिस्थितीमुळे फळबागांच्या नुकसानीची भीती कायम आहे. 

नागपूर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रात कधीपासून झाली पावसाला सुरूवात

    Ans: आज पहाटेपासून महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाऊस आहे

  • Que: बारामतीसह कुठे पाऊस पडतो आहे?

    Ans: बारामतीसह इंदापूरमध्ये पाऊस पडत आहे

  • Que: या पावसाचा काय परिणाम होणार

    Ans: या पावसामुळे अनेक पिकांवर संकट येण्याची शक्यता आहे

Web Title: Rain update heavy rain lashes baramati and most parts of indapur face a looming crisis dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • baramati news
  • pune news
  • Rain Update

संबंधित बातम्या

Pune Metro Line 3: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ३ नोव्हेंबरला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन
1

Pune Metro Line 3: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ३ नोव्हेंबरला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट
2

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप
3

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…
4

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.