राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागातील महाराष्ट्र गौरव रथयात्रेला ऐतिहासिक आणि भावनिक सुरुवात मिळाली. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रथयात्रा खालापुरातील उंबरखिंड येथून रवाना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांवर मात करून इतिहास घडवलेल्या या पवित्र भूमीतून माती कलशात संकलित करण्यात आली. या मातीचा कलश गौरव रथात ठेवून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात आला. या प्रसंगी खालापूर व कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपतींच्या पराक्रमाला नमन करत निघालेली ही रथयात्रा महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अभिमानाने जागर करत आहे.