Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय

महाविकास आघाडीच नव्हे, तर गुलाबराव जगताप आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वालाही कळंबोलीकरांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे. यंदा कळंबोलीत मतदारांनी पारंपरिक राजकीय समीकरणे मोडून काढत भाजप आणि महायुतीला स्पष्ट कौल दिला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2026 | 01:56 PM
Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रवादीचा किल्ला ढासळला
  • राजकीय परिवर्तनाची नांदी!
  • महापालिकेचा निकाल धक्कादायक!
पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाला आठ दिवस उलटत नाहीत, तोच कळंबोलीत झालेल्या राजकीय परिवर्तनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी माथाडी कामगारांचा बालेकिल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या कळंबोलीत यंदा मतदारांनी पारंपरिक राजकीय समीकरणे मोडून काढत भाजप आणि महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. या निकालामुळे केवळ महाविकास आघाडीचा पराभव झाला असे नाही, तर माथाडी कामगारांचे प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव जगताप आणि शशिकांत शिंदे यांनाही अप्रत्यक्षपणे मतदारांनी नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Chandrapur News: सत्तासंघर्ष चिघळला! एकाला महापौर, दुसऱ्याला स्थायी समिती सभापती? धानोरकर–वडेट्टीवार वाद थेट दिल्ली दरबारी

कळंबोलीतील एकूण १६ पैकी तब्बल १६ जागांवर महायुतीने विजय मिळवला. भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे प्रत्येकी दोन नगरसेवक विजयी झाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. ‘तुतारी’ चिन्हावरील उमेदवारांना तर भोपळाही फोडता आला नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

या निकालातून केवळ महाविकास आघाडीच नव्हे, तर गुलाबराव जगताप आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वालाही कळंबोलीकरांनी स्पष्ट नकार दिल्याचे बोलले जात आहे. प्रचारादरम्यान जगताप हे प्रत्यक्ष मैदानात उतरलेले दिसले नाहीत. महाविकास आघाडीने त्यांच्या बॅनर आणि फोटो लावले, मात्र ते प्रचार सभांसाठी आले नाहीत. फक्त शशिकांत शिंदे यांची एक सभा कळंबोलीत झाली. त्यामुळे जगताप हे तटस्थ राहिले का, की त्यांनी जाणीवपूर्वक अंतर ठेवले, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

माथाडी कामगारांची शरद पवारांवर निष्ठा

शिवसेना कळंबोली आणि नवीन पनवेल हे पनवेल तालुक्यात सर्वात आधी विकसित झालेले भाग आहेत. येथे लोह-पोलाद मार्केट उभे राहिल्याने मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांची वस्ती निर्माण झाली. शरद पवार मुख्यमंत्री असताना माथाडी कामगारांना घरे देणे, माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आणणे यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांतून आलेल्या माथाडी कामगारांची शरद पवार यांच्याशी दीर्घकाळ निष्ठा राहिली आणि कळंबोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

या पाश्र्वभूमीवर गुलाबराव जगताप यांनी अनेक वर्षे कळंबोलीतील माथाडी कामगारांचे नेतृत्व केले. हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बैंक, स्टील मार्केट कमिटीचे अध्यक्षपद आणि लोह-पोलाद मार्केटवरील त्यांचे वर्चस्व यामुळे कळबोलीत ‘जगताप म्हणजे राष्ट्रवादी’ असे समीकरण तयार झाले होते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही कळंबोलीत मानणारा मोठा वर्ग होता. २०१७ च्या निवडणुकीतही माथाडी कामगारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट कौल दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला अपयश

याशिवाय शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेचे प्रभारी पद स्वतःकडेच ठेवले होते. तरीही कळंबोलीसह संपूर्ण पनवेल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अपयश पत्करावे लागले. त्यामुळे संघटनात्मक अपयश, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव कमी होणे आणि बदलत्या मतदार मानसिकतेचा फटका पक्षाला बसल्याचे मानले जात आहे. एकूणच कळंबोलीतील हा निकाल म्हणजे केवळ सत्तांतर नाही, तर माथाडी कामगारांच्या राजकारणात झालेला मूलभूत बदल आहे.

Social Media Rumors Alert: उरणमध्ये ‘मुले पळवणारी टोळी’ ची अफवा? पोलिस तपासात झाले उघड

भाजपने पारंपरिक प्रभाव, करिष्मा आणि जुनी निष्ठा यांची गणिते मोडून काढत विकास, स्थैर्य आणि सत्तेच्या ताकदीचा नवा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आगामी काळात कळंबोलीचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल आणि माथाडी नेतृत्व पुन्हा उभारी घेऊ शकते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ncp defeated as lotus and bow arrow secure victory in municipal corporation raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • BJP
  • raigad
  • shivsena

संबंधित बातम्या

प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार बजेट; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू
1

प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार बजेट; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत
2

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत

Pune Mayor Election 2026 : पुण्यातील महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ नावांची जोरदार चर्चा
3

Pune Mayor Election 2026 : पुण्यातील महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Dharashiv ZP Election 2026: धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात? तिकीट वाटपात भाजपचा थेट हस्तक्षेप, शिवसैनिकांचा संताप
4

Dharashiv ZP Election 2026: धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात? तिकीट वाटपात भाजपचा थेट हस्तक्षेप, शिवसैनिकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.