सुधीर मुनगंटीवार भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण (फोटो - सोशल मीडिया)
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरमध्ये होत असते. त्याच पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी अधिवेशनाचा कालावधी वाढवून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत करण्यात आली. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रह धरला होता मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो
अधिवेशन दोनऐवजी तीन आठवड्यांचे घ्यावे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी तीन किंवा चार आठवड्याचं घ्यावं अशी मागणी केली. जर असं केलं नाही तर सावरकरांनासुद्धा न्याय मिळू शकत नाही, असे म्हणत सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भातील विषयाकडे सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. तसेच, इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट आहे असा मेसेज जाऊ नये म्हणून अधिवेशन कालावधी वाढवून आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव देखील याच अधिवेशनात मंजूर करुन घ्यावा, अशी मागणी देखील सुधीर मुनगंटीवर यांनी केली.
मात्र यावेळी त्यांनी महायुती सरकारची तुलना थेट इंग्रजांशी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे भाजपमध्ये सुधीर मुनंगटीवार पुन्हा नाराज आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीनंतर मुनगंटीवार म्हणाले, “नेहमीप्रमाणे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला सुरू होईल, दोन आठवड्यांसाठीच्या कामकाजाला आज मान्यता देण्यात आली आहे. कामकाजामध्ये आवश्यक असेल तर अधिवेशन वाढवण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल.”
Ans: हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी तीन किंवा चार आठवड्यांचे घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
Ans: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव याच हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, असा आग्रह त्यांनी धरला.
Ans: अधिवेशनाचा कालावधी वाढवला नाही तर ‘इंग्रजांपेक्षा आपले सरकार वाईट आहे’, असा संदेश जाऊ नये, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या सरकारवरील नाराजीची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.






