2026 Bajaj Pulsar RS200 Updated Sports Bike (फोटो सौजन्य-AI एआय)
Bajaj Pulsar RS200 2026 ही स्पोर्ट्स बाइक नव्या अपडेट्ससह लवकरच भारतीय मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या बाइकचे स्पष्ट फोटो समोर आले असून, यामध्ये USD फ्रंट फोर्क्स आणि 5-इंच TFT डिस्प्ले असे बदल दिसत आहेत. बजाजच्या नव्या पल्सर मॉडेल्समध्ये दिसणारे प्रीमियम फीचर्स आता RS200 मध्येही मिळू शकतात. त्यामुळे या अपडेटेड बाइकची चर्चा सुरू झाली आहे.
समोर आलेल्या फोटोंनुसार, Bajaj Pulsar RS200 2026 मध्ये सध्याच्या टेलिस्कोपिक फोर्क्सऐवजी USD फ्रंट सस्पेन्शन दिले जाणार आहे. यामुळे बाइकच्या फ्रंट लूकमध्ये बदल होण्यासोबतच राइडिंगचा अनुभवही सुधारू शकतो. नव्या 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमुळे रायडरला स्पीड, गिअर पोझिशन आणि इतर माहिती स्क्रीनवर पाहता येईल. याशिवाय स्विचगियरमध्येही बदल करण्यात आले आहेत. ब्रेक आणि क्लच लीव्हर अॅडजस्ट करता येतील, असेही फोटोंमधून दिसते.
भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू
मागच्या बाजूला नायट्रॉक्स मोनोशॉक सस्पेन्शन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स तसेच अलॉय व्हील्समध्ये मोठा बदल दिसत नाही. USB Type-C चार्जिंग पोर्टही स्टँडर्ड फीचर म्हणून मिळू शकतो. काही रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि अतिरिक्त राइड मोड्स देण्याचाही विचार होऊ शकतो. पण या फीचर्सबाबत कंपनीकडून माहिती समोर आलेली नाही.
या बाइकची सुरुवात 2015 मध्ये झाली होती. 2025 मध्ये बजाजने RS200 ला नवीन ग्राफिक्स, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, DRL आणि नव्या LED टेललॅम्पसह अपडेट केले होते. सध्याच्या मॉडेलमध्ये रोड, रेन आणि ऑफरोड असे 3 राइड मोड्स, ड्युअल-चॅनल ABS, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल-संदेश नोटिफिकेशन मिळतात.
Bajaj Chetak EV ची 10 लाख विक्री पार! इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये बजाजचा मोठा टप्पा
इंजिनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. यात 199.5cc लिक्विड-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन कायम राहू शकते. हे इंजिन 24.3 bhp पॉवर आणि 18.7 Nm टॉर्क देते. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट-स्लिपर क्लच मिळतो. सध्याच्या मॉडेलची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1.82 लाख रुपये आहे. नव्या फीचर्समुळे अपडेटेड मॉडेलची किंमत थोडी वाढू शकते. लाँचची तारीख आणि किंमत कंपनीकडून जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.






